शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद

By कुणाल गवाणकर | Updated: September 28, 2020 13:50 IST

शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एनडीएमध्ये यावं; आठवलेंचं आवाहन

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा नाराजीनाट्य घडत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत यावं, अशी साद आठवलेंनी घातली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एनडीएसोबत यावं, असंही आवाहन त्यांनी केलं.शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ५ वर्षे चालणार नाही. कामं होत नसल्यानं अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. तसं झाल्यास सरकार कोसळेल आणि राज्यात भाजपची सत्ता येईल, असं आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेला सोबत येण्याची साद घेतली. 'शिवसेनेनं चक्रव्यूहात अडकू नये. त्यांनी ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं. रिपाईंला सोबत घ्यावं आणि राज्यात सरकार स्थापन करावं,' अशी ऑफर आठवलेंनी दिली.भाजपा अन् शिवसेनेची पुन्हा युती होणार?; संजय राऊतांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात..मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावरही आठवलेंनी तोडगा सुचवला. 'उद्धव ठाकरे जवळपास एका वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखादं वर्ष मुख्यमंत्री राहावं. त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील,' असा पर्याय आठवलेंनी सुचवला. 'भाजपसोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल. त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदं मिळतील. शरद पवारांनीदेखील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एनडीएसोबत यावं,' अशी साद त्यांनी घातली.'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइन बनवण्याची भूक'; राऊत- फडणवीस भेटीवर काँग्रेसची टीका शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. मग हे दोन पक्ष एकत्र कसे येणार, असं विचारला असता, लोकसभा निवडणुकीच्या आधीही दोन्ही पक्षांचे संबंध ताणले गेले होते. सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्यानं टीका सुरू होती. राज्यात सरकारमध्ये असलेली शिवसेना नाराज होती. पण अमित शहांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि युती झाली. त्यामुळे तणाव निवळू शकतो, अशी आशा आठवलेंनी व्यक्त केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे