शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवरील हल्ला, राष्ट्रवाद हे असणार भाजपाच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:41 IST

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग ८ मार्च रोजी जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग ८ मार्च रोजी जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. हे लक्षात घेऊन भाजपा आपल्या निवडणूक रणनीतीला अंतिम स्वरुप देण्यात व्यग्र आहे. पुलवामा हल्ल्याला सडेतोड उत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला व राष्ट्रवाद हे भाजपाच्या प्रचाराचे दोन प्रमुख मुद्दे असण्याची शक्यता आहे.यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रवाद या विषयावर एक प्रेरक गीत भाजपाच्या प्रचारमोहिमेसाठी प्रसून जोशी लिहीत आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘सौगंध मुझे इस मिट्टी की मै देश नही मिटने दूंगा' हे गीत भाजपा व मोदींच्या प्रचारासाठी खास तयार करण्यात आले होते. त्याच्याच धर्तीवर आगामी लोकसभा निवडणुकांसाठीही प्रचारगीते लिहून घेण्यात येत आहेत. त्या प्रचारगीतांच्या व्हिडिओफितींमध्ये मोदींच्या भाषणांच्या दृश्यांचीही पेरणी केलेली असेल. पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ले चढविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजस्थानातील चुरू येथे जी सभा झाली त्यात त्यांनी ‘सौंगध मुझे इस मिट्टी की' या गाण्याच्या काही ओळी म्हणून दाखविल्या होत्या. देश सुरक्षित हातांमध्ये आहे याची खात्री बाळगा असे पंतप्रधान या सभेत म्हणाले होते.>मोदी है तोमुमकीन है...‘नामुमकीन अब मुमकीन है' अशी घोषणा भाजपाने याआधी प्रचलित केली होती. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ‘मोदी है तो मुमकीन है' अशी घोषणाही पक्षातर्फे दिली जाण्याची शक्यता आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले याचा आकडा मोदी सरकारने करावा अशी भाजपाचा मित्रपक्ष शिवसेना व इतर विरोधी पक्षांनी केलेली मागणी सरकारने मान्य केली नाही. बालाकोट हल्ल्यात किती जण मारले गेले असावेत याविषयी काहीही भाष्य करण्यास भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी नकार दिला आहे.या हल्ल्यात २०० ते ४०० दहशतवादी ठार झाले असावेत अशी माहिती केंद्र सरकारमधील मंत्री खासगीत देत आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी २५० दहशतवादी ठार झाल्याचे जाहीर विधान केले होते. त्यामुळे बालाकोट हल्ल्यात पाकिस्तानची नेमकी किती हानी झाली याबाबत गुढ निर्माण झाले आहे. त्या मुद्द्याचा वापर विरोधी पक्षांकडून निवडणूक प्रचारात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९