शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल; शरद पवारांची वर्षपूर्ती सोहळ्यात ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 12:40 IST

कधी नव्हे ते मिळालेली सत्ता हातून गेल्याने येणारी अस्वस्थता विरोधकांमध्ये या वर्षभरात पाहायला मिळाली.

मुंबई : महाराष्ट्रातली जनता काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी असते. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे हे सरकार पाच नाही तर २५ वर्षे टिकेल, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार उपस्थित होते.

या वेळी पवार म्हणाले, कधी नव्हे ते मिळालेली सत्ता हातून गेल्याने येणारी अस्वस्थता विरोधकांमध्ये या वर्षभरात पाहायला मिळाली. विरोधकांच्या टीकेमुळे अनेकांनी या सरकारविषयी शंका उपस्थित करून ठेवल्या होत्या. त्यामुळेच सरकारसंबंधित चिकित्सा करण्याची भूमिका माध्यमांनीदेखील घेतली. मात्र हे सरकार सगळ्या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे गेले आहे. 

‘मुख्यमंत्री झालो यावर विश्वास बसत नाही’या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो यावर अजूनही विश्वास बसत नाही. जे लोक शिवसेनेला गृहीत धरून चालले होते त्यांना आता कळून चुकले की, शिवसेना फरपटत जाणाऱ्यांपैकी नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. आपल्याला संघर्षाचा चांगला अनुभव आहे. एकमेकांशी संघर्ष करत आपण इथपर्यंत आलो. आशीर्वाद कसे कमावू शकतो हे वर्षभरात मी अनुभवले. शरद पवार वर्षभरात ज्या ज्या वेळी भेटले त्या वेळी त्यांनी अनुभवातून आलेले प्रसंग सांगितले. सरकार चालवण्यासाठीचा अनुभव त्यांनी दिला. सोनिया गांधी यांचे सतत फोनवर बोलणे होत असते. आमचे लोक त्रास तर देत नाहीत ना, असेही त्या मला विचारतात, असा चिमटाही ठाकरे यांनी काढला त्या वेळी सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. सरकारने वर्षभरात संकटग्रस्ताला धीर दिला. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही. नवीन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू आहे.- शरद पवार   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी