शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 00:54 IST

Maharashtra Politics: राज्यात दोन नवी समीकरणे जुळण्याची शक्यता असून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात दोन नवी समीकरणे जुळण्याची शक्यता असून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात दोन्ही पक्ष एकत्र आले तर ते आश्चर्यकारक ठरणार नाही, असे म्हटले होते. शरद पवार यांनी त्यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना एकत्र येऊन चर्चा करण्यास सांगितले होते. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते उत्साहित झाले. परंतु, राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र आले तर राजकारणात नवी समीकरणे तयार होऊ शकतात, अशी चिंता महाविकास आघाडीतील नेत्यांना वाटत आहे. यामुळे येत्या निवडणुकीत त्यांचे नुकसान होऊ शकते.

नुकतीच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईतील त्यांच्या कार्यालयात एक महत्त्वाची राज्य समितीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड आणि सर्व जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. ही बैठकीत धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाबाबात फक्त शरद पवारच बोलतील, असे पक्षातील नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेत सुधारणा करण्यासाठी आणि निवडणूक रणनीती अधिक धारदार करण्यासाठी एक व्यापक रोडमॅप मांडला. त्यांनी पुनर्रचनेच्या तातडीच्या गरजेवर भर दिला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि संघटना अधिक चपळ आणि प्रतिसादशील बनवण्यासाठी नवीन नियुक्त्यांचे संकेत दिले.

पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. शरद पवारांच्या पक्षाने राज्यव्यापी संपर्क दौरे सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नेते महाराष्ट्रभर प्रवास करून नागरिकांशी संवाद साधतील, त्यांच्या तक्रारी ऐकतील. शेतकरी, बेरोजगारी आणि राज्यातील दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या इतर महत्त्वाच्या समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र