शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Gram Panchayat Election Results: २५ वर्षाची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

By प्रविण मरगळे | Updated: January 18, 2021 15:10 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पत्रक काढत कार्यकर्त्यांना ताकदीनं निवडणूक लढवण्याचे आदेश दिले होते

ठळक मुद्देशहरी भागातून मोर्चा वळवून मनसेने ग्रामपंचायत पातळीवर निवडणुका पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात लढल्याअमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेतअहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ९ सदस्य निवडून आले आहेत.

मुंबई – राज्यात ग्रामपंचायतीचे निकाल येऊ लागले आहेत, या निकालात सत्ताधारी विरोधात महाविकास आघाडी असंच चित्र पाहायला मिळत आहे, राज्यातील ६ हजार ग्रामपंचायती भाजपा जिंकेल असा दावा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही धक्का बसल्याचं चित्र आहे. मात्र या संपूर्ण निकालात मनसेनेही स्वत:कडे लक्ष वेधून घेतलं आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या तुलनेत मनसेने कमी जागा पटकावल्या असल्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे, बीड, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर, याठिकाणी मनसेने आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. अंबरनाथ येथील काकोळे ग्रामपंचायत मनसेने बाजी मारली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ९ सदस्य निवडून आले आहेत.

अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात शिरपूर ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ७ पैकी ६ सदस्य निवडून आले आहेत. रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खाते उघडले आहे. बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने वर्चस्व मिळवलं आहे, याठिकाणी ७ पैकी ५ जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे.

बुलढाण्यात जिगाव ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची २५ वर्षाची सत्ता उलथवून मनसेने विजय पटकावला आहे. जिगाव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आली आहे. याठिकाणी ९ पैकी ७ जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली होती. उस्मानाबादमध्ये जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनीही विजय मिळवला आहे. औरंगाबादच्या रेणापूरमध्ये मनसेने ७ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत.  रायगडच्या जोहे येथे मनसेचा १ उमेदवार जिंकला आहे. जुन्नरच्या खिल्लारवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकवला आहे. अजूनही राज्यात ठिकठिकाणी मनसेप्रणित आघाडीचे उमेदवार जिंकल्याची माहिती आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पत्रक काढत कार्यकर्त्यांना ताकदीनं निवडणूक लढवण्याचे आदेश दिले होते, शहरी भागातून मोर्चा वळवून मनसेने ग्रामपंचायत पातळीवर निवडणुका पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात लढल्या, त्यात मनसेला यश आल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही मनसेला यश मिळणार का? हे पाहणं गरजेचे आहे.  

टॅग्स :MNSमनसेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकResult Dayपरिणाम दिवसBJPभाजपाShiv Senaशिवसेना