मुंबई - सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता पूर्ण होत आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना कडवी टक्कर देत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयानंतर भाजपाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले भरघोस यश हे नवी मुंबई, ठाणे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपाच्या विजयाची पायाभरणी आहे, असा दावा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.ग्रामपंयाचत निववडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आशिष शेलार म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. कोकणातील जनतेने भाजपाला भरभरून यश दिलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा विजय झाला आहे. तर केवळ २० ठिकाणी शिवसेना जिंकली आहे. रत्नागिरीमध्ये सुमारे ५३६ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. जिलेबी फाफडाचे राजकारण करू पाहत होते, नौटंकी करू पाहत होते. त्याला मालवणी खाजाने उत्तर दिले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात केवळ भाजप याचा अर्थ आता नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये केवळ भाजपचाच झेंडा फडकणार आहे, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
"ही तर ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेतील विजयाची पायाभरणी,"
By बाळकृष्ण परब | Updated: January 18, 2021 20:05 IST
Maharashtra Gram Panchayat Election Results Update : सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता पूर्ण होत आली आहे. तसेच राज्यातील ग्रामीण राजकारणाचे चित्रही स्पष्ट झाले आहे.
ही तर ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेतील विजयाची पायाभरणी,
ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. कोकणातील जनतेने भाजपाला भरभरून यश दिलं जिलेबी फाफडाचे राजकारण करू पाहत होते, नौटंकी करू पाहत होते. त्याला मालवणी खाजाने उत्तर दिले आहेरत्नागिरी सिंधुदुर्गात केवळ भाजप याचा अर्थ आता नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये केवळ भाजपचाच झेंडा फडकणार