शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Maharashtra Budget 2021: अर्थसंकल्प राज्याचा की केवळ काही भागांपुरता?; फडणवीसांचा ठाकरे सरकारच्या बजेटवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 15:52 IST

Maharashtra Budget 2021 BJP leader Devendra Fadnavis slams state government : महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाणं; विरोधी देवेंद्र फडणवीसांचा टीका

मुंबई: अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरसंधान साधलं आहे. केंद्राकडून आलेला निधी सांगायचा नाही. केवळ थकबाकी सांगायची. केंद्राच्या मदतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख अर्थसंकल्पात करायचा. मात्र इतर वेळी केंद्रावर टीका करायची, हेच महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. अर्थसंकल्पात याचाच प्रत्यय आला. महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाणं असल्याची टीका फडणवीस यांनी केली.आमदारांची साद अन् अजित पवारांचा प्रतिसाद; 'या' चार जिल्ह्यांसाठी मोठी घोषणाकेंद्राकडून महाराष्ट्राला साडे चौदा हजार कोटी रुपये यायचं आहे. केंद्रानं राज्याच्या वाट्याचा महसूल थकवला आहे. मात्र त्याबद्दल कोणतंही रडगाणं न गाता महाविकास आघाडी सरकार वाटचाल करत असल्याचं अर्थमंत्री अजित पवार Ajit Pawar अर्थसंकल्प  Maharashtra Budget 2021 मांडताना म्हणाले. त्यावर साडे चौदा हजार कोटी शिल्लक असल्याचं सांगतात. पण ३ लाख कोटी रुपये दिल्याचं सांगत नाहीत, असा टोला फडणवीसांनी Devendra Fadnavis लगावला. "महाराष्ट्र संकटापुढे कधीही झुकला नाही"; सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प म्हणावं की काही विशिष्ट भागांपुरता मर्यादित असलेला अर्थसंकल्प म्हणावं, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. अजित पवारांनी केलेल्या घोषणांमध्ये बरेचसे प्रकल्प आधीपासूनच सुरू आहेत. यातले काही प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीनं प्रगतीपथावर आहेत. त्यात अनेक रस्ते, महामार्ग, सिंचन आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. एका बाजूला केंद्राला नावं ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मदतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख स्वत:च्या अर्थसंकल्पात करायचा, अशी सोयीस्कर भूमिका राज्य सरकार घेत असल्याचं फडणवीस म्हणाले.राज्याच्या बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवरप्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात एकाही पैशाची तरतूद नाही. मूळ कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत अर्थसंकल्पात नाही. सोयाबीन, कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी ठरली आहे. वीज बिलासंदर्भातही सरकारनं कोणताही दिलासा जनतेला दिलेला नाही. पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलेला नाही. त्यामुळे आता केंद्राकडे बोट दाखवण्याचा कोणताही अधिकार त्यांनी राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार