शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचे सरकार भांबावलेले- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 07:38 IST

पालघरमधील तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची केली पाहणी 

पालघर/मनोर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार फक्त घोषणा करते, मात्र प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. एकावर एक कोरोनाच्या लाटा येत असताना एक दिवसाच्या जन्मलेल्या मुलीला वेळेवर उपचार देण्यात हे सरकार अपयशी ठरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालघरमध्ये केली. तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पालघर येथे आले होते. त्यावेळेस त्यांच्यासोबत खासदार गोपाल शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, सरचिटणीस सुजित पाटील, प्रशांत पाटील, समीर पाटील आदी उपस्थित होते.कोरोनाबरोबर व्यापार-उदीम पण स्थिरस्थावर झाला पाहिजे. सगळ्या व्यापार व्यवसायांना चालना मिळण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केले पाहिजे, अशी आमची मागणी होती. दुकाने संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडी ठेवणे अपेक्षित असताना, दुपारी १२ वाजेपर्यंत तर अन्य ठिकाणी २ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली असती तर डबघाईला आलेल्या व्यवसायाला स्थिरावण्याची संधी मिळाली असती, असे दरेकर यांनी सांगितले.सरकार फक्त घोषणा करते, कृती होताना दिसत नाही. पहिली लाट आली, दुसरी आली, तिसरी लाट येण्याची सूचना अगोदरच मिळाली आहे. काल पालघर येथे १२ तासाच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिला बराच वेळ ताटकळत फिरावे लागले. अखेर तिला पालघरपासून ६० किलोमीटर लांब असलेल्या जव्हार या ठिकाणी जावे लागले.मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही उपाययोजना करू, मात्र या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. सरकारने नुकसानग्रस्तांसाठी जी मदत जाहीर केली आहे, ती तुटपुंजी आहे. साधारण ३५ ते ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे शासनाकडून सांगितले जाते, मात्र माझ्या माहितीप्रमाणे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. यासाठी शासनाने तात्काळ मदत जाहीर करून नुकसानग्रस्तांना आधार द्यायला हवा, असेही दरेकर यांनी सांगितले.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ