शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

युतीचा निष्ठावंतांवर, तर स्वाभिमानचा नाराजांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 5:10 AM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निष्ठावंत विरुद्ध नाराज अशाच पद्धतीने रंगू लागली आहे.

- मनोज मुळ्येरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निष्ठावंत विरुद्ध नाराज अशाच पद्धतीने रंगू लागली आहे. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा नाराजी आणि फोडाफोडी याचीच चर्चा अधिक जोमाने सुरू आहे. शिवसेना आणि भाजप यांचे मनोमिलन झाले असले तरी ते तळागाळापर्यंत झिरपलेले नाही आणि राष्ट्रवादीसोबत जुळवून घेत प्रचार करण्याची हातोटी अजून काँग्रेसला जमलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक निष्ठांवत विरुद्ध नाराज अशाच वळणावर थांबली आहे.शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार हे प्रत्येक निवडणुकीत ठाम असल्याचे चित्र आजवर अनेकदा दिसले आहे. पण भाजपमध्ये शिवसेनेबद्दल असलेली नाराजी उघडपणे जाहीर झाली आहे. ही नाराजी मिटवून मनोमिलन करण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केले गेले आणि त्याचा बऱ्याच अंशी परिणाम दिसला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना उमेदवार राऊत यांच्या प्रचारात सहभागी झाले. मात्र हे मनोमिलन १00 टक्के नाही. पाच वर्षांत आपल्याला काहीच मिळाले नाही, हा सल भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात भाजपमधील नाराजी टिकून आहे.जी स्थिती युतीमध्ये आहे, तीच स्थिती आघाडीमध्ये आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आघाडीत एकवाक्यता नाही. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र प्रचार करताना दिसत नाहीत. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला केलेल्या मदतीची परतफेड आता लोकसभा निवडणुकीत होणार का? शरद पवार-नारायण राणे यांच्या मध्यंतरीच्या भेटीचा लाभ नीलेश राणे यांना होणार का? असे काही प्रश्न अनुत्तरित आहेत.युतीमधील नाराजी आणि आघाडीतील बिघाडी यावर राणेंच्या महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाची मदार आहे. सिंधुदुर्गात स्वत:ची ताकद असलेल्या स्वाभिमानला रत्नागिरीत अधिक परिश्रम घ्यावे लागत आहेत.या लढतीत काँग्रेस मात्र अजूनही आक्रमकपणे पुढे आलेली नाही. काँग्रेसच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात शांतताच आहे. आधीच पक्षाची झालेली असाहाय्य स्थिती आणि त्यात राष्ट्रवादीचा संभ्रम यामुळे मुख्य लढतीत काँग्रेस आपला सहभाग टिकवणार कसा, हा प्रश्नच आहे.>गत निवडणुुकीत दीड लाखाच्या फरकाने विजय मिळाला असला तरी आम्ही गाफील नाही. जिल्हा परिषद गटनिहाय प्रचार आम्ही नेटाने सुरू ठेवला आहे. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. हे निष्ठावंत कार्यकर्तेच युतीची प्रतिष्ठा कायम ठेवतील, याचा मला विश्वास आहे.- विनायक राऊत, शिवसेनापाच वर्षांत रत्नागिरी-सिंधुदुर्गात कोणतीही कामे झाली नाहीत. एकतर आराखड्यांइतके पैसेच आले नाहीत आणि आले ती रक्कमही खर्ची पडली नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा विकास ठप्प झाला आहे. सामान्य माणसाच्या हाताला काम देण्याचे ध्येय घेऊन मी रिंगणात उतरलो आहे.- नीलेश राणे, स्वाभिमान>कळीचे मुद्देभाजपची शिवसेनेबद्दलची नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभ्रमावस्था हा सर्वांत कळीचा मुद्दादोन जिल्ह्यांच्या विकासावर बोलण्याऐवजी शिवसेना-स्वाभिमानकडून वैयक्तिक आरोपांवर अधिक भर

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Vinayak Rautविनायक राऊत Nilesh Raneनिलेश राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग