शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

अर्थमंत्रालयात कमी IQ वाले, मोदींना अर्थव्यवस्थाच समजत नाही; भाजपा खासदाराकडून बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 17:08 IST

Subramanian Swamy Talking in American media Interview: अमेरिकेचा चॅनल Valuetainmentच्या पॅट्रिक बेट डेव्हीड यांनी स्वामी यांची मुलाखत घेतली. यावेळी डेव्हीड यांनी स्वामींना महात्मा गांधी, नेहरुंवर काही प्रश्न विचारले. यानंतर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आले.

भाजपाचे खासदार  सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) बोचरी टीका केली आहे. भारताच्या अर्थमंत्रालयामध्ये कमी बुद्धी, कमी आयक्यू वाले लोक असून मोदींना अर्थव्य़वस्थेबाबत काही कळत नसल्याचे ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे एकेकाळी अर्थ मंत्रालय मोदींच्याच ताब्यात देण्याचे वक्तव्य स्वामी यांनी केले होते. (Subramanian Swamy said PM like low IQ people, because they listen and did work.)

'तुम्ही भाजपाचे खासदार, मग मोदींना भेटत का नाही?' ट्विटरवरील प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामींचे उत्तर...अमेरिकेचा चॅनल Valuetainmentच्या पॅट्रिक बेट डेव्हीड यांनी स्वामी यांची मुलाखत घेतली. यावेळी डेव्हीड यांनी स्वामींना महात्मा गांधी, नेहरुंवर काही प्रश्न विचारले. यानंतर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आले. स्वामींनी गांधींबद्दल चांगले शब्द काढले, परंतू नेहरुंबाबत त्यांनी चांगले मत नसल्याचे स्पष्ट केले. डेव्हीड यांनी स्वामींना त्यांच्या मोदींबाबतच्या भोळे आणि अनुभव नसलेले अर्थशास्त्री या वक्तव्याची आठवण करून दिली. तसेच मोदींना मंत्रिमंडळात अर्थमंत्री करण्याची मागणीही एकदा स्वामींनी केल्याचे ते म्हणाले. यावर स्वामी हसले. मोदी माझे मित्र आहेत आणि त्यांना मी 70 च्या दशकापासून ओळखतो. मला असे म्हणायचे होते की, मोदींना अर्थव्यवस्थेबाबत काहीच माहिती नाहीय. हाच शब्द त्यांच्यासाठी जास्त योग्य आहे. 

देशाच्या अर्थमंत्रालयात कमी आयक्यू असलेले लोक आहेत. मी पंतप्रधानांचा जुना मित्र असल्याने मोदींना ओळखतो. त्यांनाही कमी आयक्यूवाले लोक आवडतात. ते आज्ञाधारक लोकांना पसंत करतात. हीच त्यांची कमजोरी आहे. स्वतंत्र रुपाने काम करणारे लोक त्यांना आवडत नाहीत. मला त्यामुळेच दूर ठेवण्यात आले आहे, असे स्वामी म्हणाले. जनसत्ताने याबाबतची बातमी दिली आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विटरवर एक कोटीच्या वर फॉलोअर आहेत. त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. ते दिल्लीच्या आयआयटीमध्ये प्राध्यपकही होते. तसेच योजना आयोगाचे सदस्यदेखील राहिले आहेत. मोठ्या विद्यापीठात शिकलेल्या स्वामींकडे एक चिंतन करणारा नेता म्हणून पाहिले जाते. अनेकदा ते पक्षाच्या, पक्ष नेतृत्वाच्या विरोधातही उभे राहिलेले आहेत.  

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका