शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

या फोटोतील महिला नेत्याला ओळखलं का? केला होतां आतंरजातीय विवाह, फारच रंजक आहे प्रेमकहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 1:13 PM

सुषमा स्वराज यांची केवळ स्वतःची प्रेम कथा चर्चेत राहिली नाही, तर त्यांनी अनेक जोडप्यांची मदतही केली. माजी परराष्ट्रमंत्री  (Former Minister of External Affairs) सुषमा स्वराज यांच्याबद्दलच्या अशाच काही रंजक कथांबद्दल जाणून घेऊया.

भारतातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) असणाऱ्या पहिल्या महिला सुषमा स्वराज (Sushma Swaraj Birthday) यांचा जन्म व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day 2021) दिवशी झाला, सुषमा स्वराज यांची केवळ स्वतःची प्रेम कथा चर्चेत राहिली नाही, तर त्यांनी अनेक जोडप्यांची मदतही केली. माजी परराष्ट्रमंत्री  (Former Minister of External Affairs) सुषमा स्वराज यांच्याबद्दलच्या अशाच काही रंजक कथांबद्दल जाणून घेऊया.

जेव्हा अंतरधर्मीय विवाहात आली अडचणगोष्ट लखनऊच्या एक जोडप्याची आहे. दोघंही वेगवेगळ्या धर्माचे होते, म्हणून पासपोर्ट अधिकारी त्यांच्या पासपोर्टमध्ये अडथळा आणत होता तसंच महिलेला चुकीची वागणूक दिली जात होती. ही बाब चर्चेत येताच काही कार्यकर्तेही उभे राहिले आणि पासपोर्ट अधिकाऱ्याच्या बाजूने जोरदार आवाज उठवत आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यास पासपोर्ट न देण्यास सांगितलं. अशात पीडितेनं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्वीटरच्या माध्यमातून ही गोष्ट सांगितली. यानंतर संपूर्ण परराष्ट्र मंत्रालय या जोडप्याच्या बाजूनं उभं राहिलं आणि प्रकरण मार्गी लावलं. यानंतर सुषमा स्वराज सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या. मात्र, त्यांनी ट्रोलर्सला कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं.

आणखी एक किस्सा चांगलाच चर्चेत आला होता. लखनऊमधील नकी अली खान पाकिस्तानातील एक मुलगी सबाहत फातिमा हिच्यासोबत विवाह करू इच्छित होते. मात्र, व्हिजासंदर्भात अनेक अडचणी येत होत्या. तेव्हा नकी अलीनं थेट सुषमा स्वराज यांच्यापुढे आपली अडचण मांडली आणि स्वराज यांनी पुन्हा एकदा प्रेम आणि लग्नाच्या बाबतीत जोडप्याला मोठी मदत केली. त्यावेळी पेशानं इंजिनिअर असलेले नकी अली लखनऊमधील होते तर फातिमा कराचीची रहिवासी होती. दोघंही एकमेकांना आधीपासून ओळखत होते आणि दोघांचे कुटुंबीयही त्यांना ओळखत होते. मात्र, भारत फाळणीच्या वेळी ही कुटुंबे वेगळी झाली होती. सुषमा यांच्या मदतीनंतर या दोघांचा विवाह ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष मौलाना कल्बे सादिक यांनी करून दिला होता.

पाकिस्तानी मुलगी अशी पोहोचली भारतातपरराष्ट्रमंत्री असताना सुषमा स्वराज यांनी सोशल मीडियाचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापर करत सामान्य लोकांसोबत जोडलं जाण्याचं एक साधन म्हणून याकडे पाहिलं होतं. अनेकांनी तर असंही म्हणण्यास सुरूवात केली होती परराष्ट्र मंत्रालय ट्वीटरवर चालतं. सुषमा यांनी सोशल मीडियावरून संवाद साधत अनेकांची मदत केली होती. याचाच आणखी एक रंजक किस्सा आहे.

पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी असलेली २५ वर्षीय सादिया लखनऊच्या २८ वर्षीय सैयद शारिक हाश्मीच्या प्रेमात पडली होती आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. तेव्हा सादियाला भारतात येऊन लग्न करण्यासाठी व्हिजाची समस्या उभी ठाकली. या परिस्थितीतही सुषमा स्वराज यांनीच या प्रेम कथेची नाव पार करून दिली आणि सादियाला लग्नासाठी भारतात येण्याची परवानगी मिळाली.

सुषमा यांची प्रेम कथाही होती रंजकगुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. मात्र, गुलाबाचं फुल काट्याच्या मध्ये फुलतं. याचप्रकारे, सुषमा स्वराज यांची प्रेम कथा आणीबाणीच्या काळात रंगात आली. इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर करताच एकीकडे जेपीचं आंदोलन तर दुसरीकडे गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन तीव्र झालं.

अशा परिस्थितीत ABVPच्या विद्यार्थी नेत्या असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिस सुरू केली होती. याच काळात सुषमा स्वराज यांची सहकारी वकील स्वराज कौशल यांच्यासोबत जवळीक वाढली.  स्वराज कौशल हे समाजवादी नेते म्हणून उदयात आलेल्या जॉर्ज फर्नांडिज यांचे निकटवर्तीय होते. जॉर्ज रेल्वे कामगार संघटनेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी कामगार नेता म्हणून आपला एक ठसा उमटवला होता.

इंदिरा गांधी सरकारने जॉर्जवर असा आरोप केला, की ते सरकारी इमारती आणि रेल्वे मालमत्ता नष्ट करण्यासाठीच्या डायनामाइट वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर करीत आहेत. त्यानंतर स्वराज कौशल यांनी जॉर्ज यांची केस लढवली. २६ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू झाली आणि समाजवाद आणि जॉर्जच्या बाजूनं लढत असलेल्या सुषमा आणि कौशल यांनी त्याच वर्षी १३ जुलै रोजी लग्न केले. असं म्हटलं जातं, की या लग्नाला दोघांच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र, दोघांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आणि नंतर घरच्यांना मनवून लग्न केलं. लग्नानंतर दोनच वर्षात सुषमा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. कपाळावर मोठी टिकली आणि भांगामध्ये कुंकू भरणाऱ्या सुषमा स्वराज यांची प्रेम कथा प्रत्येकाला लक्षात राहिल अशीच आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSushma Swarajसुषमा स्वराज