शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

...तर हिटलरनेही आत्महत्या केली असती, ममतांनी साधला मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:50 IST

लोकशाहीत प्रत्येकाला एकमेकांवर चिखलफेक करण्याचा अधिकार असतो.

नवी दिल्ली- लोकशाहीत प्रत्येकाला एकमेकांवर चिखलफेक करण्याचा अधिकार असतो. प्रचार रॅली आणि सभेदरम्यान नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. त्यातच अनेक नेते एकमेकांवर टीका करताना पातळीही सोडतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे. त्या व्यक्तीचं राजकारण हे हिंसा आणि दंगलींनी रंगलेलं आहे. मोदी ज्या पद्धतीनं काम करतात, कदाचित ते पाहिल्यावर एडॉल्फ हिटलरनेही आत्महत्या केली असती, असंही ममता म्हणाल्या आहेत.भाजपासारख्या देशातील सर्वात मोठ्या पक्षाशी लढण्याचा काँग्रेस दावा करत आहे. परंतु काँग्रेस मनोमन पराभूत झालेली आहे. मोदींचा सामना करण्याचा काँग्रेस नेत्यांमध्ये दम नाही. मोदी हे समाज सत्तावादीविरोधी असल्याचंही ममता म्हणाल्या आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत कोणालाही आवडत नाही. त्यांच्या भीतीपायीच भाजपामधला कोणताही नेता त्यांच्याविरोधात बोलत नाही. काँग्रेस पक्ष कमकुवत असल्यानंच भाजपा वाढत चालला आहे. राहुल गांधींना सरकार बनवण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा लागणार आहे. त्यामुळे एकदा का मोदी सत्तेतून बाहेर गेले, तर नव्या भारताचं निर्माण करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून हद्दपार करा तसेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी, असे उद्गार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी काढले होते.येथील प्रचारसभेत त्या म्हणाल्या होत्या, मोदी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील साडेचार वर्षे विदेश दौरे करण्यातच घालविले. त्यांना देशातील शेतकरी, मध्यमवर्गाकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नव्हता. निवडणुका तोंडावर आल्यानंतर मोदी आता प्रत्येकाला धमकावत आहेत आणि सर्रास खोटा प्रचार करत आहेत. धडधडीत खोटे बोलण्याच्या स्पर्धेत मोदी नक्कीच प्रथम क्रमांक पटकावतील. त्या पुढे म्हणाल्या, मोदी यांनी खोटे बोलू नये म्हणून आता जनतेनेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी. देशाच्या भल्यासाठी त्यांना केवळ पंतप्रधानपदावरूनच नव्हेतर, राजकारणातूनही हद्दपार करायला हवे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी