शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जया प्रदांचा भाजपामध्ये प्रवेश, रामपूरमधून आझम खानविरोधात निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 18:07 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि अभिनेत्रींचा राजकारण प्रवेश करण्याचा सिलसिला सुरू झाला आहे.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि अभिनेत्रींचा राजकारण प्रवेश करण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजवादी पार्टीत असलेली प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदानं भाजपामध्ये प्रवेश केला. जया प्रदा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना रामपूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जया प्रदा यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघातून 2004ला विजय मिळवला होता.या मुस्लिमबहुल भागात भाजपाला वजनदार उमेदवार सापडला असून, जया प्रदा या सपा-बसपा महागठबंधन आणि काँग्रेसलाही जोरदार टक्कर देऊ शकतात. जया प्रदा यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. रामपूरमधून दोनदा खासदार राहिलेल्या जया प्रदा यांचं सपाचे दिग्गज नेते आझम खान यांच्याविरोधात लढाई सुरू आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत जया प्रदा या अमर सिंह यांच्याबरोबर राष्ट्रीय लोकदल(आरएलडी)मध्ये सहभागी झाले होते. त्यांना बिजनौरमधून तिकीटही देण्यात आलं होतं. परंतु मोदी लाटेत त्यांचा दारूण पराभव झाला होता. भाजपा हा जय प्रदा यांनी बदललेला चौथा पक्ष आहे. 1994मध्ये तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्याच पक्षात त्या जवळपास दशकभर होत्या.परंतु एनटी रामाराव आजारी असल्यानं पक्षाचं नेतृत्व चंद्राबाबू नायडूंकडे गेलं आणि जया प्रदानं बंडखोरी केली. चंद्राबाबू नायडूंबरोबर त्यांचं फार काळ जमलं नाही. त्यानंतर त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि रामपूर लोकसभा निवडणूक लढवली. 2004च्या निवडणुकीत त्यांनी 85 हजार मतांनी विजय मिळवला. 2009लाही त्या 30 हजार मतांनी विजयी झाल्या. उत्तर प्रदेशमधल्या रामपूरमध्ये मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येनं आहे. पश्चिम उत्तर प्रदेश क्षेत्रातील रामपूरच्या जागेवर 50 टक्क्यांनी अधिक लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे. रामपूर हा समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांचा गड समजला जातो. परंतु 2014च्या निवडणुकीच्या मोदी लाटेत भाजपाच्या नेपाल सिंह यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.  

टॅग्स :Jaya Pradaजया प्रदाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक