शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने धर्माबद्दल केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:14 IST

काँग्रेसमध्ये नुकतीच सहभागी झालेली आणि उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात असलेली अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली.

मुंबई- काँग्रेसमध्ये नुकतीच सहभागी झालेली आणि उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात असलेली अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ऊर्मिला मातोंडकरनं धर्माबद्दल मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, माझे पती मुसलमान असले तरी मी हिंदूच आहे आणि त्याचा आम्हा दोघांनाही गर्व आहे. आपल्या देशात एक प्रकारची विविधता आहे. ज्याला जसं राहायचं आहे, तसं तो राहू शकतो.मला ट्रोल करणारे हे इस्लामला एका विशेष रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कधीही धर्मांतर केलेलं नाही. माझ्या पतीला जेवढा मुसलमान असल्यावर गर्व आहे, मलाही तेवढाच हिंदू असल्याचा गर्व आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ऊर्मिलानं मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिला ट्रोल केलं जातं होतं. त्या ट्रोलर्सना तिनं या मुलाखतीच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मला जातीवरून ट्रोल करणारे लोक द्वेष आणि बदल्याचं राजकारण करतात. तसेच यावेळी त्यांनी भाजपाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कोणतीही व्यक्ती गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासावर बोलत नाही. ट्रोलर्सनी दाखवून दिलं आहे की ते कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात. त्या सगळ्यांनच वाटत की राजकारणात एक ग्लॅमर डॉल आली आहे. मी बोलण्यापेक्षा माझ्या कामातून उत्तर देईन, असंही ऊर्मिला म्हणाली आहे. 

उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही ऊर्मिलानं मुंबईकर असल्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. ‘मी मुंबईकर आहे’ आणि याआधीही होती आणि यापुढेही राहणार आहे, याबाबत मला कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. मी स्टार म्हणून ही निवडणूक लढवीत नाही. आपल्या लोकशाहीमध्ये संपूर्ण जनता हीच खरी स्टार आहे. मी काँग्रेसची विचारधारा घेऊन ही निवडणूक लढणार आहे. एक चांगला विचार घेऊन मी ह्या क्षेत्रात उतरलेली आहे, असंही ऊर्मिला मातोंडकर म्हणाली आहे.मुंबईमध्ये उत्तर मुंबई हा एक खूप चांगला आणि सुंदर विभाग बनवून दाखवायचा आहे. मला कोणावरही आरोप करायचे नाही आहे. मला ही निवडणूक प्रेमाने आणि मोठ्या मनाने लढवायची आहे, द्वेषाचे राजकारण मला करायचे नाही. निवडणुकीनंतरही मी काँग्रेस पक्षासोबत असणार आहे, असे उद्गार उत्तर मुंबईतील काँग्रेसची उमेदवार आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी आज बोरिवलीमध्ये काढले. 

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmumbai-north-pcमुंबई उत्तर