शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

धक्कादायक! लालूंच्या पक्षाच्या आमदारानं मसूद अजहरला 'साहेब' म्हटल्यानं उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 20:59 IST

लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

किशनगंजः लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. अशातच बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदारानं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला साहेब म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी मंचावर आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित होते.किशनगंज येथे सभेदरम्यान आरजेडीचे आमदार हाजी सुभान यांच्या विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये हाजी सुभान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी मसूद अजहर साहेबांना चीननं विटो लावून वाचवलं. चीननं मसूद अझहर साहेब दहशतवादी नसल्याचं सांगत व्हिटोचा वापर केला. त्यामुळे त्याचं नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत आलं नाही. आतापर्यंत चीनसंदर्भात मोदींनी एक शब्ददेखील उच्चारला नाही. 50 हजार कोटींचं वर्षाला चीनकडे जात असल्यावरही ते रोखण्यासाठी आतापर्यंत कोणीही नेता पुढे आलेला नाही.आरजेडी आमदाराचा हा व्हिडीओ 29 मार्च रोजीचा असल्याचं सांगितलं जातंय. या वर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला, तीन वर्षांपूर्वी पठाणकोट आणि 2001मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात दहशतवादी जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरचं नाव पुढे आलं आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक करत अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. किशनगंज या मुस्लिमबहुल लोकसभा मतदारसंघातून जेडीयू नेते महमूद अशरफ निवडणुकीच्या रिंगणात आहे. इथे दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान होणार आहे. 

टॅग्स :Bihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019kishanganj-pcकिशनगंज