शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान पंतप्रधानांना शिव्या देणारे राजीव गांधींबद्दल बोलताच संतापतात- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 11:02 IST

राजीव गांधींबद्दलच्या विधानावर पंतप्रधान मोदी ठाम

नवी दिल्ली: माजी पंतप्रधानराजीव गांधींबद्दलच्या विधानावरुन काँग्रेसनंपंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. यावर भाष्य करताना आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. राजीव गांधींबद्दल मी केवळ तथ्य सांगितलं. त्यावरुन इतकं आकांडतांडव कशासाठी, असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला. ते 'नवभारत टाईम्स'शी बोलत होते. उत्तर प्रदेशात शनिवारी (4 मे) एका जनसभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावेळी मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यांनी राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन असं म्हटलं होतं. याबद्दल मोदींना मुलाखतीत प्रश्न विचारला. त्यावर मी केवळ तथ्य सांगितलं, असं उत्तर मोदींनी दिलं. 'मी केवळ माहिती दिली. मात्र त्यावरुन संपूर्ण काँग्रेस पक्षाला इतका राग का आला, ते मला समजत नाही. जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष एका विद्यमान पंतप्रधानाला शिव्या देतात, त्याच्या कुटुंबाची, गरिबीची टिंगल करतात, तेव्हा हाच काँग्रेस पक्ष टाळ्या वाजवत असतो,' अशा शब्दांमध्ये मोदींनी अप्रत्यक्षपणे 'चौकीदार चोर है'वर भाष्य केलं. काँग्रेस अध्यक्ष विद्यमान पंतप्रधानावर टीका करतात. मात्र त्यांच्या वडिलांबद्दल काही तथ्य सांगितल्यास त्यांचा संपूर्ण पक्ष संतापतो, असं मोदी म्हणाले. 'विशेष म्हणजे काँग्रेस पक्षातल्या कोणीही राजीव गांधी भ्रष्ट नव्हते किंवा मी चुकीचं तथ्य सांगितलं असं म्हटलेलं नाही. काँग्रेसनं दिल्लीत राजीव गांधींच्या नावावर निवडणूक लढवावी, असं आव्हान मी आधीही काँग्रेसला दिलं होतं आणि आता त्याचा पुनरुच्चार करतो,' अशा शब्दांमध्ये मोदी काँग्रेसवर बरसले. उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरदेखील टीका केली. 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राजदरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती. मोदींच्या या टीकेला राहुल यांनी उत्तर दिलं होतं. 'मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधानRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेस