शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात धुळवड; भाजपाच्या सफाईसाठी गोटेंची पवारांसोबत दिलजमाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 12:04 IST

26 वर्षांचं वैर विसरुन गोटे पवारांच्या भेटीला

मुंबई : भाजपाचे धुळ्यातील नाराज आमदार अनिल गोटेंनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात लढण्यासाठी गोटेंनी दंड थोपटले आहेत. धुळ्यात भाजपाच्या खासदाराचा पराभव करणं हेच आपलं ध्येय असल्याचं गोटेंनी म्हटलं आहे. मोदी सरकारमध्ये असलेले संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे लोकसभेत धुळ्याचं प्रतिनिधीत्व करतात. भाजप आमदार अनिल गोटे 26 वर्षांचं वैर विसरुन शरद पवार यांच्या भेटीला गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. धुळे महापालिका निवडणुकीपासून गोटे पक्षावर नाराज आहेत. आता त्यांनी थेट खासदार भामरेंविरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी गोटेंनी पवारांची भेट घेतली. 'धुळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. गुन्हेगारी, टक्केवारी वाढली आहे. पक्षातील ही घाण साफ करायची आहे,' असं गोटे म्हणाले. 'मी माझी भूमिका शरद पवारांना सांगितली आहे. मला माझा पक्ष स्वच्छ करायचा आहे.  आता मला कशी मदत करायची, हा त्यांचा निर्णय असेल. मी पुन्हा पवारांना भेटणार आहे,' असं गोटेंनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीआधी गोटेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.तेलगी प्रकरणावरुन गोटे आणि पवार यांच्यात हाडवैर निर्माण झालं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गोटे यांना तेलगीचा मित्र म्हटल्यानं वाद निर्माण झाला होता. पवार आणि गोटे यांचं विळ्या भोपळ्याचं नातं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं. मात्र आता गोटेंनी भामरेंच्या पराभवासाठी पवारांची भेट घेतली आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी शत्रू किंवा मित्र नसतो, असं गोटेंनी पवारांच्या भेटीनंतर म्हटलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारAnil Goteअनिल गोटेBJPभाजपा