शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: भावनाताई हटावसाठी तीन ‘भाऊ’ एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 04:34 IST

सेनेचे राज्यमंत्री भाजपाच्या कार्यालयात; उद्धव ठाकरेंकडे शब्द टाकण्याची मुख्यमंत्र्यांना गळ

मुंबई : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपाचे राज्यमंत्री मदन येरावार, शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड आणि भाजपाचे आमदार राजेंद्र पटणी यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. गवळी हटावसाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकावा, अशी गळ त्यांनी घातली.काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. संजय राठोड आणि राजेंद्र पटणी हे भावना गवळी यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यातच राठोड आणि ठाकरे हे दीर्घ काळापासून एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. माणिकराव वा इतर कोणीही काँग्रेसचे उमेदवार असले तरी ताई नकोच अशी भूमिका येरावार, राठोड व पटणी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. साकडे घालण्यासाठी हे तिघे भाजपाच्या मुंबई कार्यालयात दुपारी धडकले. भावनातार्इंच्या विरोधात ‘अँटिइन्कम्बन्सी फॅक्टर’ आहे, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.‘भावना गवळी चांगल्या उमेदवार आहेत पण त्यांना पर्याय द्यायचा असेल तर संजूभाऊ तुम्ही स्वत: लढायला पाहिजे आणि तुम्ही लढणार असाल तर मी उद्धवजींकडे शब्द टाकण्याचा विचार करीन असा गुगली मुख्यमंत्र्यांनी टाकला. स्वत: लढण्याबाबत संजय राठोड द्विधा मनस्थितीत आहेत. मी लढायला घाबरत नाही व जिंकल्याशिवाय राहणार नाही, या शब्दात राठोड यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली....तर पुन्हा मंत्रिपदसूत्रांनी सांगितले की, खासदार झाल्यानंतर केंद्रात आपल्याला मंत्रीपद मिळणार नाही, पण राज्यात पुन्हा भाजपा - शिवसेनेची सत्ता आली तर पुन्हा मंत्रीपद मिळेल, असा राठोड यांचा आशावाद आहे. त्यामुळेच खासदारकीला लढण्याबाबत ते द्विधा मनस्थितीत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाBhavna Gavliभावना गवळी