शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

करकरेंनी एटीएस प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल शंका- सुमित्रा महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 10:29 IST

सुमित्रा महाजन यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

भोपाळ: दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या विधानामुळे भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या होत्या. यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात पुन्हा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. करकरे यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल महाजनांनी शंका उपस्थित केली. 'त्यांचं (हेमंत करकरे) कर्तव्यावर असताना निधन झालं. त्यामुळे त्यांना शहीद मानलं जाईल,' असं महाजन म्हणाल्या. मात्र त्यांनी करकरेंच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल संशय व्यक्त केला. महाजन यांनी त्यांच्या विधानातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. महाजन यांच्या विधानाला सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं. 'सुप्रिया ताई, तुम्ही अशोक चक्र विजेत्या हेमंत करकरेंसोबत माझं नाव जोडत आहात, याचा मला अभिमान वाटतो,' अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंह यांनी दिली. काँग्रेसचे भोपाळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेल्या दिग्विजय सिंह यांनी भाजपावर शरसंधान साधलं. 'सुमित्रा ताई, तुमचे साथीदार जरी करकरेंचा अपमान करत असले, तरी मी सदैव देशहित, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा पुरस्कार करणाऱ्यांसोबत राहीन. मी कायम धार्मिक उन्माद पसरवणाऱ्यांच्या विरोधात असेन. मी मुख्यमंत्री असताना सिमी आणि बजरंग दल या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. ते धाडस मी दाखवलं, याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी देश सर्वात आधी येतो. घाणेरडं राजकारण करण्यात मला रस नाही,' अशा शब्दांमध्ये दिग्विजय सिंह यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019bhopal-pcभोपाळSumitra Mahajanसुमित्रा महाजनSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा