शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: शरद पवार यांचा ‘मावळ’कडे मोर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 04:53 IST

पवार मावळातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे.

- हणमंत पाटील पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यानंतर आता मावळ मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळविला आहे. आता मावळातून ते निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे.लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीची पहिली नऊ उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत पुणे जिल्ह्यातील मावळ व शिरूर मतदार संघातील उमेदवारांची नावे गुलदस्तात आहेत. चार दिवसांपूर्वी पवार यांनी मावळ मतदारसंघातून कुटुंबातील नव्या पिढीला संधी देणार असल्याचे सूचक विधान करीत पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र, दोनच दिवसांनंतर त्यांनी यूटर्न घेतला आहे.मावळ मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड पदाधिकारी व नगरसेवकांशी त्यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी मावळमध्ये पार्थ यांच्या उमेदवारीचा पुनरुच्चार न करता, उमेदवार कोणीही असो, कार्यकर्त्यांना प्रचार सुरू करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, अजित पवार यांनीही पनवेल येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत पार्थ यांची उमेदवारी जाहीर केलेली नसल्याचे स्पष्ट करीत यादीतून नावे जाहीर होतील, असे सूचक विधान केले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीविषयीचा संभ्रम वाढला आहे.शरद पवार व अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उमेदवार कोण हे न पाहता पक्ष देईल, त्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा सल्ला एकाच दिवशी दिला. त्यानंतर काही जाणकार व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मावळमधून पार्थ अथवा खुद्द शरद पवार यांनी निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे माढ्यातून माघार घेतलेले पवार आता मावळातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.प्रचाराचा दिला सल्ला शरद पवार व अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उमेदवार कोण हे न पाहता पक्ष देईल, त्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा सल्ला एकाच दिवशी दिला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारmavalमावळ