नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षातील तीन नावांना पसंती दर्शवली आहे. पवारांनी एका टीव्ही चॅनेलनं दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदावर भाष्य केलं आहे. पवारांनी पंतप्रधानपदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्या नावांना समर्थन दिलं आहे. जर राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)ला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं नाही आणि विरोधकांचं सरकार आल्यास हे तीन नेते पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात. या तिन्ही नेत्यांना प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव असल्याचाही उल्लेख पवारांनी केला आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे हे तिन्ही नेते राज्यांचे मुख्यमंत्री राहिले होते. पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान बनण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते. माझ्या मते एनडीएला बहुमत मिळवण्यात अपयश आल्यास ममता, नायडू आणि मायावती पंतप्रधानपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. तसेच ममता यांना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनाही पाठिंबा देऊ शकते, असंही पवार म्हणाले आहेत.
पवारांनी पीएमपदासाठी राहुल गांधी नव्हे, तर 'या' तीन नेत्यांना दिलं समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 10:10 IST