शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: घरात 9 माणसं असूनही पाचच मतं; उमेदवाराला कॅमेऱ्यासमोरच रडू कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 21:27 IST

अपक्ष उमेदवाराला अश्रू अनावर

जालंधर: लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. देशाच्या जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना सत्ता दिली आहे. विशेष म्हणजे यंदा भाजपा आणि मित्र पक्षांना गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला पुन्हा एकदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसला पन्नासच्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात निराशा आहे. तीनशेचा टप्पा पार केल्यानं भाजपाचे नेते, कार्यकर्ते आनंदात असताना जालंधरमधील एक व्यक्ती मात्र अतिशय दु:खात आहे.जालंधरमध्ये एका व्यक्तीनं अपक्ष निवडणूक लढवली होती. आपल्याला किती मतं मिळाली ते पाहण्यासाठी तो मतमोजणी केंद्रावर गेला. त्या व्यक्तीला केवळ पाच मतं मिळाली. त्यामुळे त्याला अतिशय दु:ख झालं. या व्यक्तीच्या कुटुंबात एकूण 9 सदस्य आहेत. त्यामुळे मला पाचच मतं कशी मिळू शकतात, असा प्रश्न या व्यक्तीला पडला. घरात 9 सदस्य असूनही केवळ 5 मतं मिळाल्यानं या व्यक्तीला अक्षरश: रडू कोसळलं.जालंधरमधील या अपक्ष उमेदवाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पंजाबी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीनं या उमेदवाराशी बातचीत केली. त्यात या उमेदवारानं स्वत:ची व्यथा मांडली. 'मला केवळ 5 मतं मिळाली. पण माझ्या तर घरात 9 मतदार आहेत,' असं म्हणून ही व्यक्ती धाय मोकलून रडू लागली. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्यानं आपली मतं कमी झाली, असा दावा त्यानं केला. यापुढे आयुष्यात कधीच निवडणूक लढवणार नाही, असा पणदेखील त्यानं यावेळी केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Punjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक निकाल 2019jalandhar-pcजलंधर