शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निकालाआधी विरोधकांच्या गोटात हालचाली; 19 पक्षांची दिल्लीत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 16:45 IST

निवडणूक निकालाआधी विरोधकांची मोर्चेबांधणी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन दिवस शिल्लक असताना विरोधकांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. आज दुपारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 19 विरोधी पक्षांची बैठक झाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमबद्दल तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर विरोधक निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात जाण्यासाठी रवाना झाले. या बैठकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची 100 टक्के पडताळणी करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मागणीबद्दल विरोधकांची निवडणूक आयोगासोबत चर्चादेखील झाली. त्याआधी सर्वोच्च न्यायालयानं या मागणीवरुन विरोधकांना फटकारलं. याशिवाय निवडणूक आयोगानंही ईव्हीएमबद्दल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकांना प्रत्युत्तर दिलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला धक्का बसल्यास बिगर एनडीए सरकार स्थापन करण्याच्या शक्यतांवरदेखील बैठकीत चर्चा झाली. काँग्रेससह टीडीपी, बसपा, सपा, एनसीपी, टीएमसी आणि डाव्या पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. विरोधकांकडून बिगर एनडीए सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू असताना आज संध्याकाळी भाजपानं एनडीएतील घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. एनडीएचा भाग असलेल्या सर्वच पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या बैठकीला हजर असतील. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVVPATव्हीव्हीपीएटीcongressकाँग्रेसTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू