शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राहुल गांधींमध्ये दिसतो भविष्यातील पंतप्रधान; लालूंची कन्या भरभरून बोलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 19:38 IST

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा 'कंदील' हाती घेऊन काँग्रेस विजयाचा मार्ग शोधणार आहे.

ठळक मुद्देलालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधींमध्ये मला भविष्यातील पंतप्रधान दिसतो, असं मीसा भारती यांनी म्हटलंय.

'फिर एक बार, मोदी सरकार'चा नारा देत, भाजपा आणि सत्ताधारी एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच निवडणूक लढवत आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षही जोमाने मैदानात उतरलेत. काही ठिकाणी काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांचा हात धरून महाआघाडीही केलीय. पण, त्यांनी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. अशातच, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधींमध्ये मला भविष्यातील पंतप्रधान दिसतो, असं त्यांनी अगदी जाहीर करून टाकलंय. स्वाभाविकच, काँग्रेसला नवी उमेद मिळाली असून कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा 'कंदील' हाती घेऊन काँग्रेस विजयाचा मार्ग शोधणार आहे. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांची मोठी मुलगी मीसा भारतीही रिंगणात उतरल्या आहेत. २०१४च्या निवडणुकीत पाटलीपुत्र मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजपाचे राम कृपाल यादव इथून विजयी झाले होते. परंतु, यावेळी पुन्हा याच मतदारसंघातून मीसा भारती आपलं नशीब अजमावत आहेत. लालूप्रसाद तुरुंगात आहेत, कुटुंबात कलह आहे, तरीही त्यांनी प्रचारात झोकून दिलंय. या पार्श्वभूमीवर, इंडियन एक्स्प्रेसनं त्याची मुलाखत घेतली. त्यात राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल मीसा भारतींनी अगदी मोकळेपणानं मत मांडलं. 

राहुल गांधीकडे मी भविष्यातील पंतप्रधान म्हणून पाहते. संवेदनशीलता आणि दूरदृष्टीच्या जोरावर भारतातील सर्वात जुन्या पक्षाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली आहे. भारतामध्ये सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक विविधता आहे आणि आर्थिक आणि सामाजिक विषमता आजही पाहायला मिळते. असं असताना, आत्मकेंद्री नेत्याऐवजी केवळ एक हळवा आणि उदार नेताच या देशाला समृद्धीकडे नेऊ शकतो, अशा शब्दांत मीसा भारती यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वगुणांबद्दल विश्वास व्यक्त केला. 

सत्तेत आल्यास पंतप्रधान होण्यास तयार असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत. अर्थात, पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधी किंवा कुणा अन्य नेत्याच्या नावावर महाआघाडीत एकमत नाही. त्यामुळेच, मीसा भारती यांनी केलेलं राहुल यांचं गुणगान काँग्रेससाठी विशेष महत्त्वाचं आहे.

दरम्यान, कुटुंबात कुठलेही मतभेद नाहीत, तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्यात कलह नाही, असा दावा मीसा भारती यांनी केला. उमेदवारांच्या निवडीवरून थोडी फार नाराजी प्रत्येक पक्षात असतेच, पण ती क्षणिक होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019pataliputra-pcपाटलीपुत्रLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव