शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

'मोदीजी, हिंमत असेल तर 2 कोटी रोजगारांच्या आश्वासनावर मतं मागा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 13:07 IST

हार्दिक पटेल यांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

भोपाळ: काँग्रेसला राजीव गांधींच्या नावावर निवडणूक लढवा, असं आव्हान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी प्रतिआव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर 2 कोटी रोजगारांच्या आश्वासनांवर मतं मागा, असं आव्हान हार्दिक पटेल यांनी मोदींना दिलं. ते भोपाळमध्ये बोलत होते. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचा संदर्भ देत हार्दिक पटेल यांनी मोदींना थेट आव्हान दिलं. तुमच्याच हिंमत असेल तर 2 कोटी रोजगारांच्या आश्वासनावर मतं मागा, असं पटेल म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरदेखील टीका केली होती. त्यावेळी त्यांनी राजीव गांधींचा उल्लेख भ्रष्टाचारी नंबर वन असा केला होता. मोदींच्या याच टीकेला हार्दिक पटेल यांनी उत्तर दिलं. मृत व्यक्तीबद्दल वाईट बोलणं आपल्या संस्कृतीत बसत नाही, असं हार्दिक पटेल म्हणाले. 'मोदी उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या सभेत राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन म्हणाले. मोदींनी भाषणाच्या आवेशात ते विधान केलं असं मला वाटलं होतं. मात्र त्यानंतरच्या सभांमध्येही मोदींनी त्याची पुनरावृत्ती केली,' असं पटेल यांनी म्हटलं. राजीव गांधींनी देशात दूरसंचार क्रांती घडवली. त्यांच्याविषयी मोदींनी असं विधान करणं दु:खदायक आहे. मोदींकडे त्यांच्या कामाबद्दल बोलण्यास काहीच नसल्यानं ते अशी वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीhardik patelहार्दिक पटेलRahul Gandhiराहुल गांधीRajiv Gandhiराजीव गांधी