शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोलकात्यात डावी आघाडी, काँग्रेसचे आज शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 06:21 IST

विधानसभा निवडणूक, तृणमूल, भाजपला देणार आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्ककोलकाता : विधानसभेच्या निवडणुकांसाठी समझोता झालेल्या पक्ष व काँग्रेस यांच्या आघाडीने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर लगेचच शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यांची संयुक्त सभा उद्या, रविवारी येथील ब्रिगेड परेड मैदानावर होणार असून, त्याद्वारे आपली ताकद दाखविण्याचे या पक्षांनी ठरविले आहे. 

  या आघाडीत इंडियन सेक्युलर फ्रंटही सहभागी होणार असून, रविवारच्या सभेला एक लाखांहून अधिक लोक हजर राहतील, असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.    सलग ३० वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीचा दहा वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पराभव केला. तेव्हापासून माकप, भाकप, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक या डाव्या पक्षांची ताकद कमी होत गेली.  गेल्या निवडणुकीत २९४ पैकी २०९ जागांवर तृणमूल काँग्रेस विजयी झाली. डावे पक्ष व काँग्रेस यांना मिळून ७५ जागा मिळाल्या, पण पुढे आघाडी फुटली आणि दोन्ही पक्षांच्या काही आमदारांनीही पक्षांतर केले. अलीकडे पक्षांतराची लागण तृणमूललाही लागली आणि त्या पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामा देत भाजपची वाट धरली.

ममता यांना मात्र खात्रीमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मात्र बहुमत मिळण्याची खात्री वाढत आहे. भाजपने कितीही जोर लावला  तरी त्या पक्षाला बहुमत मिळू शकणार नाही, असे त्या पक्षाचे नेते सांगत आहेत. निवडणूक नीतीतज्ज्ञ व ममता बॅनर्जी यांचे सल्लागार प्रशांत किशोर यांनी तर ममताच मुख्यमंत्री होतील, असे आपण आताच लिहून देतो, तसे होते की नाही ते निकालाच्या दिवशी पाहा, असे म्हटले आहे.

दोन तृतीयांश बहुमत मिळवून भाजपचे डावपेच उधळून लावूराहुल गांधी, काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहनतुतीकोरिन : अन्य पक्षांचे आमदार फोडून स्वत:चे सरकार स्थापन करणे, असा लोकशाहीला मारक प्रयोग भाजपने सुरू केला आहे. पुदुच्चेरी हे त्याचे ताजे उदाहरण आहे. भाजपचे हे डावपेच उधळून लावण्यासाठी काँग्रेसने केवळ साधे बहुमत मिळवून चालणार नाही. विधानसभा निवडणुकांत दोन तृतीयांश बहुमत मिळाले, तरच भाजपची कारस्थाने थांबविता येतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केले. ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेश, गोवा, मध्यप्रदेश येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे  भाजपने आपले आमदार फोडले, सरकारे स्थापन केली. राजस्थानातही आपले आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. झारखंडमध्येही सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनीकोणत्याही राज्यात आपल्याला व सहकारी पक्षाला काठावरील बहुमत मिळवण्यात आनंद मानू नये आणि  दोन तृतीयांश बहुमत मिळविण्यासाठी कामाला लागावे. ते झाले, तरच भाजपचा घोडेबाजार थांबविता येईल. राहुल गांधी केरळ, तामिळनाडू व पुदुच्चेरी दौऱ्यावर असून, या तिन्ही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१