शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

उल्हासनगरातील कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर? भाजपा शिष्टमंडळाचे विरोधी पक्षनेत्यांना साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 17:09 IST

Ulhasnagar : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शहर कोअर कार्यकारिणीची बैठक पक्षाच्या कार्यालयात बोलाविली होती. 

ठळक मुद्देपक्षाचे भव्य शहर जिल्हा कार्यालय उभारणीला दोन्ही नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलाविलेल्या शहर कोअर कमिटीच्या बैठकीत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हे उभे केले. शहर विकासासाठी निधी, भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीत सिंधी समाजाला प्राधान्य, भव्य शहर पक्ष कार्यालय आदींवर चर्चा झाल्याची माहिती पुरस्वानी यांनी दिली.

उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे स्पष्ट बहुमत असतांना, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाला अपयश आले. याप्रकाराने भाजपाचा करिष्मा शहरातून कमी झाल्याची टीका झाली. भाजपातील ओमी कलानी समर्थक बंडखोर नगरसेवकांनी शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्याने, भाजपाच्या सत्तेला ग्रहण लागले. भाजपाला शहरात पुन्हा जुने दिवस आणण्यासाठी शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी यांनी कंबर कसली आहे. 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शहर कोअर कार्यकारिणीची बैठक पक्षाच्या कार्यालयात बोलाविली होती. या बैठकीला शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, राजेश वधारीया, प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, प्रकाश माखिजा आदीजन उपस्थित होते. शहर विकासासाठी केंद्राकडून विशेष निधी, भुयार गटार योजना, भारत स्वच्छता अभियान यांच्यासह शहरातीलविकास कामासाठी निधीची मागणी केली. 

याचबरोबर, अनैतिक धंदे, जुगार अड्डे, ऑनलाईन जुगार, हुक्का पार्लर, अंमली पदार्थाची विक्री यासह हाणामारी, खुनाचा प्रयत्न, चोरी, आदी गुन्ह्यात वाढ झाल्याचे सांगत भाजपा शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले. पक्षाचे भव्य शहर जिल्हा कार्यालय उभारणीला दोन्ही नेत्यांनी पाठिंबा दिला. एकाच वेळी ५०० कार्यकर्ते बसण्याची सुविधा जिल्हा कार्यालय असणार असून २५ जण राहू शकतील अशी व्यवस्था असणार आहे.

शहर भाजपातील वाद चव्हाट्यावर? शहर विकासासाठी निधी, शहरातील कायदा व सुव्यवस्था, भव्य कार्यालय, सिंधी समाजाला मुख्य कार्यकारिणीत प्रतिनिधित्व देणे आदी प्रकरणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. आदींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, पक्षातील नगरसेवक व पक्ष पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा सूर आवळला. आदी प्रकाराने पक्षातील वाद चव्हाट्यावर येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील