शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Krishna Sugar Factory election result: सत्ताधारी पुन्हा झाले कारभारी; कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व जागांवर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 07:52 IST

कारखान्याच्या निवडणुकीसाठी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार, डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत आणि अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल या तीन पॅनेलचे मिळून ६३ तर ३ अपक्ष असे एकूण ६६ उमेदवार रिंगणात होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने सर्वच २१ जागांवर  विजय मिळविला. त्यामुळे सत्ताधारी सहकार पॅनेलच पुन्हा कारभारी झाल्याचे स्पष्ट झाले. (Krishna Sugar Factory election result declared.)

कारखान्याच्या निवडणुकीसाठी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार, डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत आणि अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल या तीन पॅनेलचे मिळून ६३ तर ३ अपक्ष असे एकूण ६६ उमेदवार रिंगणात होते. ४७ हजार १४५ मतदारांपैकी मयत मतदार वगळता ९१ टक्के मतदारांनी मंगळवारी मतदान केले. कऱ्हाड येथील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये गुरुवारी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच सत्ताधारी सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. सर्वात पहिल्यांदा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांची मते मोजण्यात आली. यामध्ये सहकार पॅनेलचे विलास भंडारे हे २० हजार ३३३ मते मिळवून विजयी झाले. इतर मागास प्रवर्ग गटातील सहकार पॅनेलचेच वसंतराव शिंदे २० हजार ३२६ मते मिळवून विजयी झाले तर भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गात अविनाश खरात यांनी २१ हजार १३४ मते मिळवून विजय संपादन केला. महिला राखीव प्रवर्गात सहकार पॅनेलच्या इंदूमती जाखले यांनी १९ हजार ५९४ तर जयश्री पाटील यांनी १९ हजार ८७६ मते मिळवत विजय मिळविला. वडगाव हवेली - दुशेरे गटात सहकार पॅनेलचेच धोंडीराम जाधव हे २० हजार ६५, जगदीश जगताप १९ हजार ५१३ तर सयाजी यादव १९ हजार ४०४ मते मिळवून या गटातून विजयी झाले.

कार्ले कार्वे गटातून सहकार  पॅनेलचे दयानंद पाटील २० हजार ३०७, गुणवंतराव पाटील १९ हजार ७२६ आणि निवासराव थोरात हे १९ हजार ७४७ मते मिळवून विजयी झाले. 

रेठरे हरणाक्ष बोरगाव गटातून सहकार पॅनेलचे जयवंत मोरे २० हजार १११, जितेंद्र पाटील २० हजार २१८ आणि संजय पाटील हे १९ हजार ७०० मते मिळवून विजयी झाले. 

नेर्ले तांबवे गटातून सहकार पॅनेलच्या दत्तात्रय देसाई २० हजार १०९, लिंबाजी पाटील १०३४७ तर संभाजीराव पाटील यांनी १९ हजार ८०१ मते मिळवत विजय संपादित केला. तर सहकार  पॅनेलचे नेते सुरेश भोसले यांनी रेठरे बुद्रुक शेणोली गटातून २० हजार २७८ तर बाजीराव निकम यांना १८ हजार ५३९ मते मिळवून विजयी झाले. 

येडे मच्छिंद्र वांगी गटातून सहकार पॅनेलचे शिवाजी पाटील २० हजार १५५ तर बाबासाहेब शिंदे हे १९ हजार ४८९ मते मिळवून विजयी झाले. संस्थापक आणि रयत पॅनेलला मात कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चारीमुंड्या चित करण्याच्या इराद्याना उतरलेल्या संस्थापक पॅनेलचे अविनाश कदम आणि रयत  पॅनेलचे इंद्रजित मोहिते यांना पराभवाचा धक्का बसला आहे. अविनाश मोहिते यांना ९ हजार ९६१ तर इंद्रजित मोहिते यांना ४ हजार ७५१ मते मिळाली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने