शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तिकरांची सायकल रॅली, तर निरुपम यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:42 IST

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी गोरेगाव पूर्व येथे सायकल रॅलीचे आयोजन केले होते.

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी गोरेगाव पूर्व येथे सायकल रॅलीचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे, आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी गाठीभेटींवर आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत रविवारी प्रचार केला.युतीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी गेल्या रविवारीही देसाई यांनी गोरेगाव पश्चिम भागात कीर्तिकर यांच्या सुमारे तीन तास सायकल रॅली काढली होती. वाळकेश्वर येथील सरकारी पुरातन बंगल्यात ते रोज ५ किमी रायकल फेरी पूर्ण करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. सायकल रॅलीत भाजपचे जयप्रकाश ठाकूर, महिला विभाग संघटक व नगरसेविका साधना माने, नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर आदी सामील झाले होते. गजानन कीर्तिकर यांनी अंधेरी पश्चिम परिसरातील प्रचार रथफेरी दरम्यान आझादनगर येथील एका कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रचार रथ फेरीचा प्रारंभ शाखा क्रमांक ६६ येथून झाला आणि आझादनगर येथे समाप्ती झाली. प्रचार रथफेरीच्या दरम्यान भाजपचे आमदार अमित साटम, शिवसेना पदाधिकारी वीणा टॉक, प्रसाद आयरे, संजय पवार, शरद जाधव, हारून खान व महायुतीचे कार्यकर्ते सामील झाले होते. काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी रविवारचा दिवस गाठीभेटींवर आणि कार्यकर्त्यांशी संवादावर घालविला. सोमवारी सकाळपासून ते पुन्हा परत जोराने प्रचाराला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, हे सगळे सुरू असतानाच निरुपम मतदारांशी संवाद साधत असून, कार्यकर्त्यांच्या गाठभेटीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करत आहेत.

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019