शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

केरळ: चर्चा वायनाडची, पण तिरंगी लढतींमध्ये आघाड्यांचा लागेल कस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:36 IST

देशातील १०० टक्के साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये यावेळी तीन वेगवेगळ्या आघाड्या आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत.

नवी दिल्ली : देशातील १०० टक्के साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये यावेळी तीन वेगवेगळ्या आघाड्या आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. माकपाच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी आणि कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाहीवादी आघाडी यांच्यात पूर्वापार या राज्यामध्ये लढत होत आहे. यंदा मात्र भाजपनेही येथे ताकद लावलेली आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या तिरंगी लढती रंगतदार ठरणाºया आहेत.मागील निवडणुकीमध्ये कॉँग्रेसला आठ तर माकपाला पाच, भाकप आणि आरएसपीला प्रत्येकी एक तर मुस्लीम लीगला दोन जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी कॉँग्रेसला सर्वाधिक ३१ टक्के मते मिळाली होती. त्याखालोखाल माकपाला २२, भाजपा १० तर भाकपला ८ टक्के मते मिळाली होती. अपक्षांनाही १२ टक्के मतांचा लाभ होऊन दोन जागा त्यांना मिळाल्या होत्या. मुस्लीम लीगने ५ टक्के मते घेतली. यानंतर २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर कमी (२३.७० टक्के) झाली. याचा फायदा माकपाला होऊन त्यांची मते वाढली तसेच राज्यात डाव्या आघाडीचे सरकारही आले. या निवडणुकीमध्ये माकपा (२६.५५ टक्के), भाजपा (१०.५३ टक्के), भाकप (८.१२ टक्के) तर मुस्लीम लीग (७.४० टक्के) मते मिळाली होती. शबरीमाला, महापुराची पार्श्वभूमी शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेश प्रकरणाचा राजकीय लाभ मिळविण्याचा सर्व पक्षाचा प्रयत्न आहे. आॅगस्टमध्ये आलेल्या महापुराने झालेले नुकसान हे प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे होते.यंदा वेगळे काय?माकपा व भाकपची डावी आघाडी आहे. कॉँग्रेस आणि मुस्लीम लीगची संयुक्त लोकशाहीवादी आघाडी झाली आहे. मागील निवडणुकीतील कामगिरी कायम राखण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे.भाजपच्या नेतृत्वाखालील भाजप,बीडीजेएस आणि टीएलकेसी या पक्षांनी आघाडी केली आहे. भाजप प्रथमच येथून लोकसभेमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहे.काँग्रेसची प्रतिष्ठा पणालावायनाडमधून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी कॉँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री शशी थरूरही रिंगणात आहेत. त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूवरून विरोधक त्यांना अडचणीत आणू पाहत आहेत. मतदारांचा कौल मात्र २३ मे रोजीच कळेल

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019wayanad-pcवायनाड