शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'पतीनं एनडीएला मत न दिल्यास त्याला उपाशी ठेवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 15:34 IST

नितीश कुमारांचा महिला मतदारांना सल्ला

मधुबनी: तुमच्या पतीनं एनडीएला मतदान न केल्यास त्यांना जेवण देऊ नका. त्यांना उपाशीच ठेवा, असा सल्ला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांना दिला. तुमच्या पतींना एनडीएला मतदान करण्यास सांगा. त्यांनी एनडीएला मतदान न केल्यास त्यांना जेवायला देऊ नका. दिवसभर त्यांना उपाशीच राहू दे, असं नितीश कुमार म्हणाले.  ते मधुबनीत एका प्रचारसभेत येथे बोलत होते. झांझरपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या मधुबनीमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नितीश यांनी अंधाराथरीमध्ये महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. मोदी देशात आणि देशाबाहेर अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. या परिस्थितीत काम करताना त्यांनी जगभरात देशाची मान उंचावली. जगातल्या अनेक देशांकडून त्यांचा सन्मान होत आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींचं कौतुक केलं.यावेळी नितीश यांनी राष्ट्रीय जनता दलावर शरसंधान साधलं. लालू-राबडी यांच्या सत्ताकाळातले काळे दिवस लक्षात ठेवा आणि संयुक्त जनता दल-भाजपा सरकारनं केलेली विकासकामं विसरू नका, असं नितीश म्हणाले. महाआघाडी जाती-धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ता मिळवायची आणि बिहारच्या जनतेला लूटायचं हेच महाआघाडीचं ध्येय असल्याची टीका त्यांनी केली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019jhanjharpur-pcझांझरपूरNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेड