शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

“यांचे तर गुलाल खोबरं तिकडं चांगभलं...; टक्केवारी घेणाऱ्यांनी दुसऱ्याची मापे काढावीत हे हास्यास्पद”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 14:22 IST

निवडणुका आल्या की गावात यायचं आणि मेळावे घ्यायचे हे यांचे धंदे, त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये असा इशारा पावसकर यांनी राजेंद्र यादवांना दिला.

ठळक मुद्देज्यांना आपला वार्ड नीट करता आला नाही, ते स्मार्ट सिटीची भाषा करतात, स्वत:ला जनशक्ती आघाडीचे गटनेते म्हणवून घेतातनुसतं नाव त्यांचे घ्यायचे आणि पालिकेत बोर्डावर यशवंत आघाडीचे गटनेते असे लिहायचंचोर, दरोडेखोर, यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असे कॅमेरे असतात, पण या गोष्टींचे विरोधकांना वावडं काय वाटतंय?

कराड – माझी आणि राजेंद्र यादवांचीही पार्श्वभूमी कराडकरांना माहिती आहे, ज्यांना कष्टच माहिती नाही, ज्यांचा व्यवसाय टक्केवारीवर चालतो, त्यांनी दुसऱ्याची मापे काढावीत ही बाब हास्यास्पद आहे, नापास होऊन पालिकेत आलेल्या लोकांनी दुसऱ्यांची मापे काढू नयेत, जमेल तेवढ्या जबाबदारीने लोकांची कामे करावीत असा टोला ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांना लगावला आहे.

नगरसेवक पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, जनशक्ती आघाडीच्या राजेंद्र यादव यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पावसकर आणि नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यावर टक्केवारीचा आरोप केला होता, त्या संदर्भात भाजपाने पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी नगरसेवक पावसकर बोलत होते, यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेवक सुहास जगताप, फारूक पटवेकर, नगरसेविका विद्या पावसकर उपस्थित होते.

पावसकर म्हणाले की, राजेंद्र यादव यांची राजकीय कारकिर्दच फसवेगिरीतून उभी राहिली आहे, त्यांना आम्ही निवडून आणल्यावर आमचा हार त्यांनी स्वीकारला आणि आम्हाला फसवत ते त्यावेळच्या विरोधकांबरोबर गेले यातून त्यांची नीतिमत्ता दिसून येते, आता ते आमच्याबद्दल तत्त्वाच्या गोष्टी बोलतात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही फसवले, आमच्या नीतिमत्तेवर बोलण्याचा त्यांना अधिकारच काय? त्यांचं आमदारकीचं स्वप्न अपूर्ण राहिलंय, त्यामुळे ते शहराला त्रास देत आहेत. जिल्ह्यात आमदार, खासदार, पालकमंत्री आहेत, त्यांना डावलून हे स्मार्ट सिटी करण्याची भाषा करत आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच ज्यांना आपला वार्ड नीट करता आला नाही, ते स्मार्ट सिटीची भाषा करतात, स्वत:ला जनशक्ती आघाडीचे गटनेते म्हणवून घेतात, त्या आघाडीचे नेते अरूण जाधव आहेत. नुसतं नाव त्यांचे घ्यायचे आणि पालिकेत बोर्डावर यशवंत आघाडीचे गटनेते असे लिहायचं हे लोकांना कळत नाही का? निवडणुका आल्या की गावात यायचं आणि मेळावे घ्यायचे हे यांचे धंदे, त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये असा इशारा पावसकर यांनी राजेंद्र यादवांना दिला.

मग यांच्या पोटात का दुखतंय

आम्ही सोमवार पेठेत सीसीटीव्ही बसवले, त्यात त्यांच्या पोटात काय दुखतंय? असा सवाल करत पावसकर म्हणाले, चोर, दरोडेखोर, यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असे कॅमेरे असतात, पण या गोष्टींचे विरोधकांना वावडं काय वाटतंय? मग यांचेच असले दोन नंबरचे धंदे आहेत की काय? अशी शंका येते असं पावसकर म्हणाले.

यांचे तर गुलाल खोबरं तिकडं चांगभलं...

गुलाल खोबर तिकडे चांगभलं म्हणणारी प्रवृत्ती विरोधकांची आहे, मला जनतेनं निवडून दिलं आहे, माझा राजीनामा मागायचा अधिकार विरोधकांना नाही, ज्यांना लोकांनी घरी बसवलंय, ते माझा राजीनामा मागतायेत याचे आश्चर्य वाटते असे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या, कोरोनाकाळात लोकांसाठी मी काम केले, तुम्हाला कोणी अडवलं होतं? आमची माप काढण्यातच तुम्ही वेळ घालवला.

टॅग्स :Karadकराड