शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

मुश्रीफ-चंद्रकांतदादा यांच्यात कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 14:34 IST

Pune, Politics, chandrakant patil, Hasan Mushrif, kolhapur, vidhanparishad elecation पुणे पद‌वीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात मात्र महापालिकेच्या निवडणुकीसारखा कलगीतुरा सुरू आहे. त्यात गंमत म्हणजे पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांची चर्चाच उमेदवार व त्यांचे प्रचारकही विसरून गेले आहेत. मूळ मुद्दे सोडून निव्वळ राजकीय आरोपांचा धुरळा उडत आहे.

ठळक मुद्देवर्चस्व दाखविण्याचा आटापिटा पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न फाट्यावर

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : पुणे पद‌वीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात मात्र महापालिकेच्या निवडणुकीसारखा कलगीतुरा सुरू आहे. त्यात गंमत म्हणजे पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांची चर्चाच उमेदवार व त्यांचे प्रचारकही विसरून गेले आहेत. मूळ मुद्दे सोडून निव्वळ राजकीय आरोपांचा धुरळा उडत आहे.खरंतर ही विधान परिषदेतील आमदार निवडून देण्याची निवडणूक. विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह म्हटले जाते. त्यामुळे या निवडणुकीतील मतदारही सुशिक्षित असतो. त्यामुळे प्रचारही मुद्द्याला धरून व्हायला हवा परंतु ती अपेक्षाच फोल ठरली आहे. गेल्या निवडणुकीतही असा प्रचार झाला नव्हता. या निवडणुकीत मुख्यत: भाजपकडून जास्त राजकीय तिखट हल्ले सुरू आहेत.

पुणे पदवीधरमध्ये भाजपचा आमदार होता. शिक्षक मतदार संघात विनाअनुदानित कृती समितीचे दत्तात्रय सावंत आमदार आहेत. त्यांनी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता म्हणजे सध्या एक-एक बलाबल आहे; परंतु पद‌वीधरमध्ये चंद्रकांत पाटील यापूर्वी दोनवेळा निवडून आल्याने त्यांना ही जागा राखणे प्रतिष्ठेचे बनले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एक सुरक्षित मतदारसंघ तयार करता आला नाही म्हणून त्यांना कोथरूडमध्ये जावे लागले, अशी टीका त्यांच्यावर होत आली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्या हातून निसटला तर पक्षांतर्गतही त्यांना ते अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे त्यांनीही अस्तित्वाची लढाई म्हणून शड्डू ठोकला आहे.मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैरत्वास जिल्हा बँकेतील राजकारणाचाही किनार आहे. बँकेच्या गेल्या निवडणुकीनंतर आमदार पाटील यांच्या पुढाकाराने मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदास सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु आमदार पी. एन. पाटील यांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने हे शक्य झाले नाही. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सत्तेचा वापर करून मुश्रीफ यांच्यावर कुरघोड्या केल्या.

मुश्रीफ हे असे नेते आहेत की त्यांना कायमच (रोजच म्हणा..) चर्चेत राहायला आवडते. यापूर्वी जेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करत असत तेव्हा संघटनेला अंगावर घेऊन त्यांच्या टीकेला मुश्रीफ हेच प्रत्युत्तर देत होते. राष्ट्रवादीतील अन्य एकही नेता त्यावेळी तोंड उघडत नव्हता. आताही तसेच आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या कोणत्याही विधानाला सरकार महाविकास आघाडीचे असले तरी प्रत्युत्तर फक्त मुश्रीफ हेच देत आहेत. त्यांच्या या स्वभावानुसारच शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला मुश्रीफ यांनी उत्तर दिले. गंमत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातीलही एकाही शिवसेना नेत्याने अशा पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर दिलेले नाही. त्यामुळे मुश्रीफ आता पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही गुडबुकमध्ये स्थान बाळगून आहेत.पदवीधरांचे प्रश्न१) शिक्षण सेवक पद्धत रद्द करणे.२) विविध पदांची भरती करणे.३) सीएचबीधारकांना दरमहा नियमितपणे मानधन देणे.४) पदवीधरांना बेरोजगार भत्ता देणे.५) युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीचे नियोजन करणे.शिक्षकांचे प्रश्न१) जुनी पेन्शन योजना लागू करावी.२) विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमांनुसार अनुदान द्यावे.३) समान सेवाशर्ती लागू करणे.४) शिक्षक, कर्मचाऱ्यांची भरती करणे.५) वेतनोत्तर अनुदान पूर्ववत सुरू करणे.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPuneपुणेPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर