शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले

By बाळकृष्ण परब | Updated: September 22, 2020 15:26 IST

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या मागणील शरद पवार यांनी दिलं प्रत्युत्तर

मुंबई - एकीकडे कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाच सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना राणौत आणि शिवसेना वाद, तसेच नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला झालेला मारहाण यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी मागणी करणाऱ्यांना टोला लगावला आहे.राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांना सुनावले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नवनीत राणा तसेच इतर काही जणांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात राष्ट्पती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.दरम्यान, राज्यसभेमध्ये कृषिविषयक विधेयक मांडण्यात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र या प्रश्नावरून होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने संमत करून घेतलेल्या कृषिविषयक दोन विधेयकांविरोधात २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी शेतकरी आंदोलन होणार आहे.

सत्ताधारी शिवसेना सूडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप करत आठवलेंनी केली होती राष्ट्रपती राजवटीची मागणीमहाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात  गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, ती सत्ताधारी शिवसेना  सूडबुद्धीने काम करत आहे. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा या ज्येष्ठ नागरिकावर शिवसेनेने जबरी हल्ला केला त्या हल्ल्याचे समर्थनही शिवसेनेने केले आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई पोलिसांनी केली नाही. हल्लेखोर जामिनावर बाहेर आहेत, कंगना राणावतला ही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यात वातावरण गढूळ झाले आहे. सूडबुद्धीने वागणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला बरखास्त केले पाहिजे अशी मागणी पुढे आली आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या पुढे आलेल्या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले होते.खासदार नवनीत राणा यांनीही केली होती राष्ट्रपती राजवटीची मागणीराज्यातील कोरोना संकट हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे केंद्राकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी म्हटले होते. राज्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून आहेत. ते मातोश्रीतून बाहेर पडायला तयार नाहीत. इतर मुख्यमंत्री जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत असताना उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानाबाहेर निघत नाहीत. त्यामुळेच राज्यातील परिस्थिती भीषण झाल्याचं त्या म्हणाल्या होत्या. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRamdas Athawaleरामदास आठवलेShiv Senaशिवसेना