शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

...तर वाराणसीत नरेंद्र मोदींचा ट्रम्प करून दाखवेन, काँग्रेसच्या एकमेव खासदाराने दिले आव्हान

By बाळकृष्ण परब | Updated: January 16, 2021 19:22 IST

Balu Dhanorkar challenges Narendra Modi : २०२४ च्या निवडणुकीमध्ये पक्षाने आदेश दिल्यास वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प करून दाखवेन अशी गर्जना राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देपक्षश्रेष्ठींनी आदेश द्यावा, बाळू धानोरकर तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीला जातिथे जाऊन निवडणूक नाही लडलो आणि नरेंद्र मोदींना नाही पराभूत केलं, तर मी बाळू धानोरकर नाहीमाझी एक अट आहे. की मोदींनीसुद्धा एकाच ठिकाणाहून निवडणूक लढवावी. एकतर ते राजकारणात राहतील किंवा मी राहीन

मुंबई - पंतप्रधानपदासाठी दावेदारी केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवण्यासाठी उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघाची निवड केली होती. या मतदारसंघातून लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये मोदी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. मात्र आता २०२४ च्या निवडणुकीमध्ये पक्षाने आदेश दिल्यास वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प करून दाखवेन अशी गर्जना राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.याबाबत बाळू धानोरकर म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आज माझ्याकडे तीन वर्षांचा कालावधी आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश द्यावा, बाळू धानोरकर तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीला जावा. मग तिथे जाऊन निवडणूक नाही लडलो आणि नरेंद्र मोदींना नाही पराभूत केलं, तर मी बाळू धानोरकर नाही, असा इशाराच बाळू धानोरकर यांनी दिला आहे.

मी पक्षश्रेष्ठींकडे याच्यासंदर्भाच माहिती दिली आहे. सर्वांना सांगितलं आहे की मी तयार आहे. माझी एक अट आहे. की मोदींनीसुद्धा एकाच ठिकाणाहून निवडणूक लढवावी. एकतर ते राजकारणात राहतील किंवा मी राहीन, असे अव्हान बाळू धानोरकर यांनी दिले.बाळू धानोरकर पुढे म्हणाले की, मोदी तिकडे सांगतात की ते चहा विकणाऱ्याचे मुलगे, चहा विकणारा होतो. मग हा बाळू धानोरकर काही कमकुवत नाही. २०१४ मध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढले तेव्हा मी शिवसेनेचा पूर्व विदर्भातील एकमेव आमदार होतो. पुढे २०१९ मध्ये मला भाजपाचे काही विचार पटले नाहीत म्हणून मी शिवसेना सोडून काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि अवघ्या १५ दिवसांच्या काळामध्ये मी हंसराज अहिर या तीन वेळा निवडून आलेल्या नेत्याला पराभूत केले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.माझी आतापर्यंतची कारकीर्द पाहिल्यास मी इतिहास घडवलेला माणूस आहे. इतिहास घडवायचा हाच माझा उद्देश आहे. राजकरणात येण्यासाठी किंवा पद, मंत्रिपदं घेण्यासाठी माझा जन्म झालेला नाही, असेही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण