शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पदवीला अडखळली निम्म्या उमेदवारांची गाडी, कोणत्या मेरिटवर होते मतदान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:47 IST

लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये निम्म्या उमेदवारांची गाडी पदवीलाच अडखळलेली दिसून आली आहे. तर, उर्वरीतांपैकी दोघे जण अशिक्षित आहेत.

- मनीषा म्हात्रे मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये निम्म्या उमेदवारांची गाडी पदवीलाच अडखळलेली दिसून आली आहे. तर, उर्वरीतांपैकी दोघे जण अशिक्षित आहेत.मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, पश्चिम, मानखुर्द शिवाजी नगर हे विधानसभा क्षेत्रात उच्चभ्रू लोकवस्तीबरोबरच सर्वसामान्य मतदार अधिकआहेत. यात, घाटकोपरसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग राहतो. अशात संमिश्र लोकवस्ती असलेल्या या मतदार संघात, एकूण २७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यात, युतीचा उमेदवार दहावी तर, आघाडीचा उमेदवार पदवीधर आहे.अपक्षांमध्येही उच्चशिक्षित तसेच तरुण पिढीचा पुढाकार कमी दिसून आला. यामध्ये ७ जण पदव्युत्तर, ५ जण पदवीधर आहेत. मतदारांचा शिक्षणाबरोबरच अनुभवी तसेच काम करणा-या उमेदवाराकडे कल अधिक असल्याचेही दिसून येते. त्याने, जास्तीत जास्त मतदारांच्या प्रश्नांना केंद्रापर्यंत नेत, त्या मार्गी लावणे गरजेचे असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.>मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?शिक्षित उमेदवारच हवानिवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्यांमध्ये शिक्षित उमेदवार असेल, तो आमचे प्रश्न मार्गी लावू शकतो. आमच्या तरुण पिढीचे जो नेतृत्व करू शकेल आणि आमच्या शैक्षणिक, तसेच विकासाच्या मुद्द्याला केंद्रापर्यंत पोहोचवू शकेल.- अश्विनी भोर, नोकरी, घाटकोपर.अनुभवही महत्त्वाचा..उमेदवार हा शिक्षितच हवा. त्यापेक्षाही तो अनुभवी आणि काम करणारा पाहिजे. शिक्षित असेल, तर आमचे प्रश्न समजून घेत ते मांडू शकतो. अन्यथा त्यालाच समजले नाही, तर तो केंद्रात काय भूमिका बजावणार.- लता पाटील, गृहिणी, मुलुंड.शिक्षण हवेच...सद्यस्थितीत कोणीही उठून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहते. त्यांनाही किमान पदवीधर असण्याची अट घालायला हवी. जेणेकरून तो काम करेल. शिक्षणाबरोबरच तो भ्रष्टाचारी नको. काम करणारा हवा.- संहिता बनकर, विद्यार्थी, विक्रोळी.>७ पदव्युत्तर तर६ पदवीधर...अपक्षांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा, ७ पदव्युत्तर, ६ पदवीधर उमेदवारांची लगबग जास्त असली, तरी समाधानकारक नाही. उच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे, असा एक मोठा मतप्रवाह आहे. तो येथेही पाहावयास मिळाला.७ महिला उमेदवार..२७ उमेदवारांमध्ये ७ महिला उमेदवारही निवडणुकीसाठी सज्ज आहेत. यात गृहिणी, समाजसेविकांचा समावेश आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई