शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
8
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
9
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
10
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
12
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
13
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
14
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
15
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
16
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
17
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
18
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
19
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
20
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची भाषा राजकीय नेत्यासारखी, संतप्त शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार

By बाळकृष्ण परब | Updated: October 14, 2020 14:44 IST

Sharad Pawar News : राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रामधून हिंदुत्वाची आठवण करून दिल्याने या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत.

ठळक मुद्देराज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीसारखी नाही तर राजकीय नेत्यासारखीशरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यपालांबाबत केली तक्रार

मुंबई - कोरोना काळात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून आज राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यपालांनी या पत्रामधून मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिल्याने या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. दरम्यान, राज्यपालांनी पाठवलेल्या या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीसारखी नाही तर राजकीय नेत्यासारखी आहे असा टोला पवार यांनी लगावला आहे. तसेच शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यपालांबाबत तक्रार केली आहे.या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची भाषा ही दुर्दैवाने राजकीय पक्षाच्या नेत्यासारखी आहे. हे पत्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्यासमोर आले आहे. या पत्रामधून राज्यपालांनी कोरोना काळात बंद असलेली मंदिरे सामान्य जनतेसाठी उघडण्याची सूचना केली होती. 

दरम्यान, आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ह्यधर्मनिरपेक्षह्ण हा शब्द जोडला गेला आहे. ज्याचा अर्थ सरकारसाठी सर्व धर्म समान आहेत आणि त्यांचे रक्षण होते, असा होतो. म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीने संविधानामधील अशा आचारांनुसार वागले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं होतं असं उत्तरआपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ह्यमाझे कुटूंब, माझी जबाबदारी ह्य हि मोहीम राबवली जात असल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी पत्रातून करुन दिलीय. महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्याचें हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.  केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे  असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ  ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा सेक्युलॅरिझम आहे तो आपल्याला मान्य नाही का?  मला या संकटाशी लढताना काही येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र