शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लतादीदी, सचिन केंद्रामुळे झाले लक्ष्य- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:05 IST

पॉप सिंगर रिहानावरही केली टीका

ठाणे : लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर ही मोठी माणसे आहेत. एकच हॅशटॅग वापरून केंद्र सरकारने त्यांना ट्विट करायला लावणे अयोग्य होते. अशा मोठ्या मंडळींची प्रतिष्ठा केंद्र सरकारने पणाला लावणे चुकीचे आहे. हा सरकारच्या धोरणांचा विषय होता, देशाचा नव्हे. आता टीकेचे धनी ही मोठी मंडळी होत आहेत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.राज ठाकरे शनिवारी ठाण्यात पक्षांतर्गत बैठकीसाठी आले होते. माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ज्या पॉप सिंगरच्या ट्विटमुळे हा वाद निर्माण झाला त्या रिहानावरही राज यांनी जोरदार टीका केली. रिहाना ही कोण बाई? तिने ट्विट करण्याआधी ती कोणाला माहीत होती का? या बाईला सरकार उत्तर देतंय की, आमच्या देशाचा प्रश्न आम्ही सोडवू. मग, ‘अगली बार ट्रम्प सरकार’ अशी भाषणे अमेरिकेत करण्याची गरज नव्हती, तो त्यांच्या देशाचा प्रश्न होता. कृषी कायदा चांगला आहे, फक्त तो एक-दोन जणांच्या फायद्याचा ठरू नये, असेही राज म्हणाले.शेतकरी आंदोलन इतके चिघळण्याची गरज नव्हती. सरकारने आणलेला कृषी कायदा चुकीचा नाही. त्याच्यात निश्चित त्रुटी असतील. परंतु केंद्राने प्रत्येक राज्याचा विचार करून राज्यांशी चर्चा करून या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. प्रत्येक राज्याची कृषिधोरणे वेगवेगळी आहेत. प्रत्येक राज्यातील कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून केंद्राने निर्णय घेतला पाहिजे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. चीन-पाकिस्तान सीमेवर जितका बंदोबस्त नसेल तितका बंदोबस्त शेतकरी आंदोलनात ठेवला आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने समजून घेतल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.राज ठाकरे उवाच:अयोध्येला जाण्याची इच्छा मी व्यक्त केली. मात्र तेथे जाण्याची तारीख निश्चित केलेली नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. वाढत्या इंधन दरवाढीबाबत राज म्हणाले की, वीजदरवाढीविरोधात सरकार निर्णय घेत नाही ते इंधन दरवाढीविरोधात काय घेणार? एकीकडे शिवसेना इंधन दरवाढीविरोधात, तर दुसरीकडे भाजप वीजबिलवाढीविरोधात आंदोलन करीत आहे. हा लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. भाजपला आंदोलन करण्याची काय गरज? त्यांनी केंद्राशी बोलावे.अदानी-पवार भेटीने वीजमाफी रद्द?वीजबिल माफीसाठी राज्यपाल कोश्यारी यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी शरद पवारना भेटा असे सांगितले. पवार यांना भेटलो. त्यांनी वीज कंपन्यांना पत्र देण्यास सांगितले. परंतु गौतम अदानी यांनी पवार यांची भेट घेतली व वीजबिल माफ न करण्याचे सरकारने जाहीर केले, असा आरोप ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेLata Mangeshkarलता मंगेशकरSachin Tendulkarसचिन तेंडुलकर