शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena: शिवसेनेत युवा उमेदवारांना संधी देण्याचा विचार; निवडणुकीसाठी ठरला ‘हा’ महत्त्वाचा निकष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 14:24 IST

कोविड काळामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ५० पेक्षा कमी वयोगटातील उमेदवारांना संधी देण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा आहे.

मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यंदाच्या निवडणुकांवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे प्रचारावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. अलीकडेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील सर्व शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदारांची बैठक घेत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवा असा आदेशच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

त्याच आता शिवसेनेत(Shivsena) पन्नाशी ओलांडलेल्यांना उमेदवारी मिळणार का? अशी चर्चा सुरु आहे. विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यानुसार शिवसेनेत ५० वर्षावरील विद्यमान नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीचं तिकीट न देण्याबाबत माहिती समोर आली आहे. त्यामुळे याआधीही ३ टर्म असो  ४ टर्म निवडून आलेला असो तिकीट मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वय ग्राह्य धरुनच तिकीट मिळेल अशी कुजबूज सुरु असल्याचं समोर आलं आहे.

त्यात शिवसेनेत जुने आणि नवे शिवसैनिक यांच्यात मध्यंतरीच्या काळात काही वाद समोर आले होते. आदित्य ठाकरेंची युवासेना आणि शिवसेना यांच्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं चित्र समोर आलं. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय असतील की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेना मुंबई महापालिका निवडणूक लढवणार का हे आगामी काही दिवसांत कळेल. परंतु तत्पूर्वी शिवसेनेच्या गोटातून ५० वर्षावरील नगरसेवकांना वेटिंगवर राहावं लागण्याची शक्यता आहे.

मात्र शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे कुठलीही चर्चा शिवसेनेत नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात निवडणुकीची तयारी सुरु आहे. तरुणांना संधी मिळाली हवी पण त्यासाठी ज्येष्ठांना डावलण्यात येणार नाही असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेबाबत प्रकाशित झालेल्या बातम्या कुणीतरी हेतुपुरस्पर पेरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सर्वच राजकीय पक्षांमध्ये कुजबूज

गेल्या २ वर्षापासून जगात तसेच राज्यात कोरोनाचं संकट आहे. या कोरोनाच्या संकटात नव्या पिढीने जोमानं रस्त्यावर उतरुन सक्षमपणे परिस्थिती हाताळायला हवी. कोविड काळात वयस्कर नेत्यांना काही निर्बंध पाळावे लागतील. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळायला हवी अशी चर्चा इतर राजकीय पक्षांमध्येही आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत पक्ष नेतृत्व काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेElectionनिवडणूक