शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मोदींना प्रचारासाठी घेऊन या, तुमच्या किती जागा येतात बघू; ओवेसींचं भाजपला थेट आव्हान

By कुणाल गवाणकर | Updated: November 26, 2020 18:16 IST

हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं; भाजप-एमआयएममध्ये जुंपली

हैदराबाद: महापालिका निवडणुकीच्या प्रचारावरून हैदराबादमध्ये राजकारण तापलं आहे. मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचे (एमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिलं आहे. भारतीय जनता पक्षानं मोदींना प्रचारासाठी बोलवावं. त्यांच्या किती जागा निवडून येतात पाहू, असं ओवेसींनी म्हटलं आहे. हैदराबादमध्ये डिेसेंबरच्या सुरुवातीला पालिकेची निवडणूक आहे.तुम्ही नरेंद्र मोदींनी हैदराबादमध्ये बोलवा आणि प्रचार करा. मग काय होतं, ते आम्ही पाहू. त्यांना इथे सभा घेण्यास सांगा. तुमच्या किती जागा निवडू येतात ते आम्ही बघतो, असं आव्हान ओवेसींनी भाजपला दिलं. महापालिका निवडणुकीसाठी मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा घेऊन मतांचं ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप ओवेसींनी केला आहे.'हैदराबादमध्ये महापालिकेची निवडणूक आहे. पण ते विकासाबद्दल बोलणार नाहीत. हैदराबाद विकसित शहर आहे. या भागात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं आहेत. पण भाजपला हैदराबादची ही ओळख पुसायची आहे. त्यांना हैदराबादची प्रतिमा मलीन करायची आहे,' असे गंभीर आरोप ओवेसींनी केले. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते सातत्यानं ओवेसींना लक्ष्य करत आहेत. हैदराबादचे पक्षाध्यक्ष बंडी संजय आणि दक्षिण बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी हैदराबादमध्ये घुसखोरी होत असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे.हैदराबादमधील रोहिंग्या आणि पाकिस्तानी लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करू, असं विधान बंडी संजय यांनी केलं होतं. तर खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसींची तुलना थेट मोहम्मद अली जिन्ना यांच्याशी केली होती. ओवेसी म्हणजे आधुनिक जिन्ना आहेत. ते जुन्या हैदराबादमधील हजारो रोहिंग्यांचं संरक्षण करत आहेत, असा गंभीर आरोप सूर्यांनी केला होता. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी