शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे इंधन दरवाढ :पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 20:06 IST

Prithviraj Chavan Satara-केंद्रातील मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे तसेच हट्टवादी धोरणामुळे इंधनाची भरमसाट दरवाढ झालेली आहे. इंधनावर लादलेला मोठा कर कमी केला तरी दर कमी करता येणे शक्य आहे. मोदींनी एका हाताने दिले अन दहा हातांनी लोकांकडून काढून घेतले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देमोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे इंधन दरवाढ :पृथ्वीराज चव्हाण मोदींनी एका हाताने दिले दहा हातांनी काढले; खुली चर्चा करायला काँग्रेस तयार

सातारा : केंद्रातील मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे तसेच हट्टवादी धोरणामुळे इंधनाची भरमसाट दरवाढ झालेली आहे. इंधनावर लादलेला मोठा कर कमी केला तरी दर कमी करता येणे शक्य आहे. मोदींनी एका हाताने दिले अन दहा हातांनी लोकांकडून काढून घेतले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.सातारा येथील काँग्रेस कमिटीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला आघाडीच्या धनश्री महाडिक, युवकचे अध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आदींची उपस्थिती होती.आ. चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारच्या भूमिकेमुळेच इंधन, गॅस यांची भाववाढ झालेली आहे. कोरोनातील लसीकरण, किसान सन्मान योजना, गॅसचे मोफत वाटप या योजना राबविण्यात आल्याचे मोदी सांगत असले तरी सरकारच्या तिजोरीतून वाटलेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त पैसे मोदींनी लोकांच्या खिशातून काढून घेतले आहेत. इंधन दरवाढ करुन लोकांवर बोजा टाकण्यात आलेला आहे. पाकिस्तानात ५१ रुपयांना पेट्रोल मिळते. आपल्याकडे मात्र आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी इंधनावर भरमसाट कर लादण्यात आलेला आहे, तो मोदींनी पहिल्यांदा कमी करण्याचा निर्णय घ्यावा.दरम्यान, इंधनदरवाढ ही मागील सरकारच्या चुकीच्या आयात धोरणांमुळे झाल्याचा आरोप मोदींनी केला आहे, याबाबत विचारले असता, ह्यआम्ही त्याबाबत खुली चर्चा करायला तयार आहोत. देशात ८५ टक्के तेल आयात केलं जातं. काँगे्रसने जे केलं ते खुलेपणाने आम्ही मांडलेलं आहे, असे स्पष्टीकरण आ. चव्हाण यांनी केले.तेलाचे किती साठले शोधले ते सांगा...!काँग्रेस सत्तेवर असताना देशांतर्गत इंधनाचे साठे शोधून काढण्यात आले. बॉम्बे हाय हे त्याचे उदाहरण आहे. आपल्या देशात ८५ टक्के तेल आयात करावे लागतं, अशा परिस्थितीत केंद्रातील सत्तेच्या सहा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने देशांतर्गत तेलाचे किती साठे शोधून काढले, ते त्यांनी स्पष्ट करावं, असे आव्हान देखील आ. चव्हाण यांनी दिले.

टॅग्स :PoliticsराजकारणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSatara areaसातारा परिसर