नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. पंजाबमधील मोगा येथून शेती बचाव आंदोलनाची सुरुवात केली आहे. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर सरकारला हे कायदे संमत करून घ्यायचे होते तर सर्वात आधी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांच्याबाबत चर्चा व्हायला हवी होती. ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल. त्याच दिवशी या तिन्हा काळ्या कायद्यांना संपुष्टात आणून कचऱ्याच्या डब्यात फेकून देईल, असा शब्द राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिला.शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी शेतकऱ्यांना हमी देऊ इच्छितो की, ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल, त्या दिवशी या तिन्ही काळ्या कायद्यांना नष्ट करेल आणि या कायद्यांना कचऱ्यांच्या डब्यात फेकून देईल. मी पंजाबमधील शेतकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की, काँग्रेस देशभरातील शेतकऱ्यांच्या सोबत उभी आहे. काँग्रेस आपल्या आश्वासनापासून एक इंचही मागे हटणार नाही. मोदी सरकार एमएसपीला संपवू इच्छित आहे. तसेच शेतीचा सर्व बाजार अंबानी आणि अदानींना सोपवण्याची तयारी करत आहे. मात्र काँग्रेस पक्ष असे होऊ देणार नाही,राहुल गांधी म्हणाले की जर शेतकरी या नव्या कायद्यांमुळे समाधानी असतील तर देशभरात शेतकरी आंदोलन का करत आहेत. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन का करत आहेत. तसेच कोरोनाकाळात हे तीन कायदे लागू करण्याची काय घाई होती, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.
‘’काँग्रेस सत्तेवर आल्यावर पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायद्यांना कचऱ्याचा डबा दाखवणार’’
By बाळकृष्ण परब | Updated: October 4, 2020 15:43 IST
Rahul Gandhi Kheti Bachao Yatra News : ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल. त्याच दिवशी या तिन्हा काळ्या कायद्यांना संपुष्टात आणून कचऱ्याच्या डब्यात फेकून देईल, असा शब्द राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिला.
‘’काँग्रेस सत्तेवर आल्यावर पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायद्यांना कचऱ्याचा डबा दाखवणार’’
ठळक मुद्देकाँग्रेस देशभरातील शेतकऱ्यांच्या सोबत उभी आहेमोदी सरकार एमएसपीला संपवू इच्छित आहेशेतीचा सर्व बाजार अंबानी आणि अदानींना सोपवण्याची मोदी सरकारची तयारी