शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest : "शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही", प्रियंका गांधींनी सुनावले खडेबोल

By बाळकृष्ण परब | Updated: January 28, 2021 21:56 IST

Farmer Protest update : शेतकरी नेत्यांवर कारवाई करण्यासाठी सुरू असलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्याने शेतकरी आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आज गाझीपूर सीमेवरून शेतकरी आंदोलकांना हटवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने तयारी केल्याने वातावरण बिघडले आहे. शेतकरी नेत्यांवर कारवाई करण्यासाठी सुरू असलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.प्रियंका गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, काल रात्री शेतकरी आंदोलन लाठीच्या बळावर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्यात आळा. आज गाझीपूर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांना धमकावण्यात येत आहे. हे लोकशाहीच्या प्रत्येक नियमाच्या विरोधातील आहे. काँग्रेस शेतकऱ्यांसोबतच्या या संघर्षामध्ये उभी राहील. शेतकरी हे देशाचे हित आहे. जे शेतकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही आहेत.प्रियंका गांधी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, आंदोलनातील हिंसक तत्त्वांवर कारवाई करण्यात यावी. मात्र जे शेतकरी शांततेने आंदोलन, संघर्ष करत आहेत. त्यांच्यासोबत देशाची जनता ही संपूर्ण शक्तीने उभी राहील.प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये आयोजित ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या गाझीपूरच्या सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्यासाठी प्रशासनाने सूचना दिल्या असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण