शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
4
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
5
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
6
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
9
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
10
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
11
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
12
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
13
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
14
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
15
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
16
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
17
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
20
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 

काँग्रेसची अस्तित्वाची, तर भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:57 IST

जालना लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूल आहे.

- संजय देशमुखजालना लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूल आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सलग पाचव्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवत असून, यावेळीही विजयासाठी ते अथक प्रयत्न करताना दिसून येत आहे. पक्षबांधणी आणि केलेली विकास कामे या मुद्दयावर ते मत मागत आहेत.काँग्रेसाठी ही निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे. गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयश्री खेचून आणता आली नाही. दानवे हे २००९ चा अपवाद वगळता नेहमीच कुठल्याना कुठल्या लाटेवर निवडणुन आले आहेत. यंदा अशी कुठलीच लाट नसल्याने त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागत आहे. मध्यंतरी मित्रपक्षाचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना निवडणुकीत आव्हान देण्याची गर्जना केली होती. त्यामुळे त्यांचे मन वळवितांना दानवेंची मोठी दमछाक झाली. यामध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच श्रीकृष्णाची भूमिका निभवावी लागली होती. मोठ्या प्रयत्नांती खोतकर यांचे बंड शमविण्यात यश आले.हे जरी खरे असले तरी दानवे आणि खोतकरांच्या वादात शिवसैनिक भरडला गेला. नेमके कोणाचे ऐकावे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता. आता हा मुद्दा निकाली निघाल्यावर खोतकर आणि दानवे गळ्यात गळे घालून फिरत आहेत. मात्र, शिवसैनिक कुठली भूमिका घेतात ही देखील महत्वाची बाब ठरू शकते.

भाजपकडे कुशल संघटन कौशल्य असल्याने त्या जोरावर दानवे यांची स्थिती मजबूत असल्याचे बोलले जात आहे. परंतू, केंद्र आणि राज्यातील सरकारने शेतकरी विरोधी घेतलेली भूमिका तसेच राफेलचा मुद्दा आणि शहीद सैनिकांच्या नावावर मते मागण्यासाठीचा आटापिटा या बाबी न पटणाऱ्या आहेत.त्यातच दानवे यांनी केलेले शेतकरी विरोधी वक्तव्यही नागरिक विसरलेले नाही तर दुसरीकडे काँग्रेसने स्वच्छ प्रतिमा असलेल्या सेवादलाचे राज्य अध्यक्ष विलास औताडे यांना मैदानात उतरविले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी दिसत नाही. प्रत्येकजण औताडे यांना विजयी करण्यासाठी जिवाचे रान करत आहे. विकासकामे करताना दानवे यांनी त्यांच्या नातेवाईकांचे आर्थिक हित कसे जपले हा मुद्दा औताडेकडून प्रचारात उचलला जात आहे. वंचित आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे किती मते खेचतात याकडे लक्ष लागून आहे.
>गेल्या पाच वर्षामध्ये केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने विविध विकास कामांना कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणला. ड्रायपोर्ट, आयसीटी, जिल्ह्यातील रस्ते आदंीचा यात समावेश आहे. या निवडणुकीत आपण विकासाच्या मुद्दयावरून मत मागणार असून, जनता निश्चित साथ देईल- रावसाहेब दानवे, भाजप>विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षामध्ये केवळ धुळफेक करण्यात आली आहे. २० वर्षापासून भाजपचेच खासदार असताना पाहिजे तसा विकास झालेला नाही. एकूणच प्रस्तापितांविरूद्ध यावेळी वातावरण असल्याने त्या वातावरणाचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे.- विलास औताडे, काँग्रेस>कळीचे मुद्देकाँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा जिल्ह्यात असलेला कमी संपर्क महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.भाजप-शिवसेनेचे मनोमिलन झाले असले, तरी याचे पडसाद प्रत्यक्ष मतदानावर कसे पडतात हे २३ मे ला मतमोजणीनंतर कळणार आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019jalna-pcजालना