शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

"ओबीसी आरक्षणासाठी बारा काय १०६ आमदारांचे निलंबन झालं तरी संघर्ष करत राहू,’’ देवेंद्र फडणवीसांचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 16:47 IST

Devendra Fadnavis News: ओबीसी आरक्षणावरून सभागृहात आणि तालिका अध्यक्षांच्या चेंबरमध्ये सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घातला. यावेळी, धक्काबुक्की आणि शिविगाळ झाल्याचा ठपका ठेवत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले आहे.

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज विधानसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणावरून सभागृहात आणि तालिका अध्यक्षांच्या चेंबरमध्ये सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घातला. यावेळी, धक्काबुक्की आणि शिविगाळ झाल्याचा ठपका ठेवत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले आहे. या कारवाईवरून भाजपा आक्रमक झाली असून, कामकाजावर बहिष्कार घातल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ( "Even if 126 MLAs are suspended for OBC reservation, we will continue to fight," said Devendra Fadnavis.)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती ती सरकारने खरी केली. ओबीसी आरक्षणावरून सरकारला आम्ही उघडं पाडलं. आमच्या १२ आमदारांना खोटे आरोप करून निलंबित केले. मात्र मी एक स्पष्ट करू इच्छितो की, ओबीसी आरक्षणाकरिता १२ काय १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही संघर्ष करत राहू. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही एक वर्ष नाही तर पाचही वर्ष निलंबन झालं तरी पर्वा करत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका मांडली.

फडणवीस पुढे म्हणाले की, आधीही लोक मंचावर चढले होते. अनेकदा दालतान बाचाबाची होते, पण कुणी सस्पेंड होत नाही. आजसुद्धा असाच प्रकार घडला मात्र भाजपाच्या आमदाराने शिवी दिलेली नाही. आता माझ्यावर उद्या हक्कभंग आणला तरी चालेल. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, याबाबत स्टोरी तयार करण्यात आली. तिथे शिव्या कुणी दिल्या, हे सर्वांना पाहिलंय. शिवसेनेचे सदस्य तिथे आल्यानंतर वाद झाला. त्यानंतर आमचे सदस्यही आक्रमक झाले. मात्र आम्ही वाद वाढू दिला नाही. मी स्वत: अनेकांना रोखले. त्यानंतर आशिष शेलार यांनी सर्वांच्या वतीने तालिका अध्यक्षांची माफी मागितली. मग भास्कर जाधव यांनी आशिष शेलार, गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली. मात्र नंतर सभागृहात तालिका अध्यक्षांनी आमच्या आमदारांचे निलंबन केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा