शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे यांनीच ठाण्याचे पैसे दिले नाहीत - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 23:23 IST

Narayan Rane : महापालिकेच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून निधी येणे शिल्लक असल्याचा उल्लेख आहे. याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे.

ठाणे : ठाणे शहराला राज्य सरकारकडून येणेबाकी असलेले पैसे नगर विकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत. त्यांनी ठाणेकरांचे पैसे अडविले आहेत. ते जर त्यांनी दिले तर ठाण्याचा विकास होईल, अशा शब्दांत खा. नारायण राणे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. महापालिका निवडणुकीत भाजपची स्वबळावर सत्ता येईल, असा दावाही राणे यांनी केला.महापालिकेच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून निधी येणे शिल्लक असल्याचा उल्लेख आहे. याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. महापालिकांना त्यांच्या हक्काचा निधी देणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. शिंदे यांनीच ठाणेकरांचा निधी अडविला आहे. त्यामुळे ते पैसे त्यांच्याकडेच असल्याचा टोला लगाविला. ५०० चौरस फुटांच्या घरांना अद्याप करमाफी दिलेली नाही. अगोदर वचने देतात आणि तोंडाला पाने पुसण्याचे काम शिवसेना करत असल्याचे राणे म्हणाले. ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कुणाचा अंकुश राहिलेला नाही. अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. याचाच अर्थ अधिकारी आणि शिवसेनेची मिलीभगत आहे. मात्र, धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे