शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत कॉँग्रेस-आपमधील संभाव्य आघाडी संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 04:26 IST

हरयाणा, पंजाबमुळे फिसकटले

नवी दिल्ली : दिल्लीखेरीज अन्य राज्यांमध्ये आम आदमी पक्षासाठी जागा सोडणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने कायम ठेवल्याने या दोन पक्षांत आता दिल्लीतही आघाडी होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाने शनिवारी तशी घोषणाच केली.दिल्लीत आपने चार तर काँग्रेसने तीन जागा लढवाव्यात, असा समझोता काँग्रेसने सुचवला होता. त्याबाबत विचारता आपचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, राजधानीत कॉँग्रेससाठी ३ जागा सोडणे म्हणजे भाजपला त्या जागा बहाल करण्यासारखे आहे. ते म्हणाले की, कॉँग्रेसने हरयाणामध्ये ६:३:१ असे जागा वाटपाचे सूत्र पुढे केले होते. काँग्रेससाठी ६ जननायक जनता पक्षासाठी (जेजेपी)३ आणि ‘आप’साठी १ जागा असा प्रस्ताव होता. कॉँग्रेसचे दिल्लीत अस्तित्व नाही. तरीही त्यांना ७ पैकी लोकसभेच्या निम्म्या जागा हव्या होत्या. त्याच धर्तीवर कॉँग्रेसने पंजाब, हरयाणामध्ये आघाडी करायला हवी होती. पंजाबमध्ये आपचे २० आमदार आणि ४ खासदार आहेत. तरीही त्या राज्यासाठी आमच्याशी आघाडी करायला काँग्रेस का तयार नाही?आणखी एक संधी देणारआपचे नेते गोपाल राय म्हणाले की, कॉँग्रेसशी आघाडी करण्याच्या अखेरच्या प्रयत्नांमुळे ‘आप’ने उमेदवारांचे अर्ज भरणे स्थगित के ले होते. आज, शनिवारी आमचे पूर्व दिल्लीतील उमेदवार अर्ज दाखल करणार होते. मात्र, कॉँग्रेसला आघाडीच्या चर्चेसाठी आम्ही आणखी एक संधी देणार आहोत. त्यामुळे आमचे सर्व उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसAAPआप