शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्ट्यांमुळे वाढली उमेदवारांची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:57 IST

मुंबईसह राज्यातील १७ जागांवर २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, त्याआधी आलेल्या सलग सुट्ट्या, लगीनसराई यामुळे उमेदवार आणि निवडणूक आयोगाच्या चिंता मात्र वाढल्या आहेत.

मुंबई : मुंबईसह राज्यातील १७ जागांवर २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, त्याआधी आलेल्या सलग सुट्ट्या, लगीनसराई यामुळे उमेदवार आणि निवडणूक आयोगाच्या चिंता मात्र वाढल्या आहेत. सलग सुट्ट्यांचे निमित्त करून लोकांनी पिकनिकचे प्लान केल्यास मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि राजकीय नेत्यांनी नागरिकांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी शासकीय कार्यालये-आस्थापना, बँकांना सुट्टी असते. शिवाय, अनेक खासगी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही पाच दिवसांच्या आठवड्याचे सूत्र वापरले जाते. त्यामुळे शनिवार २७ आणि रविवार २८ एप्रिलला अनेकांना सुट्टी असणार आहे. त्यातच सोमवारी २९ एप्रिलला मतदानामुळे मिळणाºया आणखी एका सुट्टीची भर पडणार आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे अनेक जण सहकुटुंब पर्यटन, देवदर्शन वगैरेसाठी प्रवासाचे बेत आखण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याचा संभव आहे.त्यात भर म्हणजे सध्या लग्नसराईचा काळ आहे. शिवाय, २६, २७ आणि २८ या तिन्ही दिवशी लग्नाचे मुहूर्त आहेत. अनेकांनी आधीच मुहूर्त आणि मंगल कार्यालयांच्या उपलब्धतेनुसार तारखा निश्चित केल्या आहेत.कोकण अथवा पश्चिम महाराष्ट्रात मूळ गावी लग्न करण्याचा ट्रेंड अनेक घरांमध्ये असतो. तशीच स्थिती पोटापाण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड वगैरे भागातून मुंबईत स्थायिक झालेल्या अन्य भाषिकांची आहे. २६, २७ आणि २८ दरम्यान आप्त आणि मित्रमंडळींच्या आपापल्या भागातील लग्नाला हजेरी लावून २९ ला मतदानासाठी मुंबईत परतणे अनेकांना शक्य होणार नाही. या सर्वांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाहीच्या निर्मितीसाठी जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. लग्नसभारंभ किंवा अन्य काही कार्यक्रम ठरवले असले तरी मतदानाचा दिवस मोकळा ठेवावा, मतदानापुरता तरी वेळ लोकांनी काढायला हवा. गावी जाणाºया नागरिकांनी २९ एप्रिलनंतरचा बेत ठरवावा, असे आवाहन आम्ही मतदारसंघात करत आहोत.- राहुल शेवाळे, खासदार आणि दक्षिण मध्यचे शिवसेना उमेदवारगावी जा किंवा आणखी कुठेही जा, पण त्याआधी मतदान करा. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. देशात स्वच्छ सरकार यायला हवे. त्यासाठी मतदान आवश्यक आहे.- आमदार नसीम खान,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष>वीकेण्डला जोडून मतदानाचा दिवस असल्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. हा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आयपीएल सामन्यांदरम्यानही मतदानाच्या जागृतीसाठी जाहिरातबाजी केली जाणार आहे. तसेच नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘माय फस्ट व्होट माय सेल्फी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.- शिवाजी जोंधळे,मुंबई शहर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019