शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार? मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 14:05 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा दिला आहे. "मला नेत्यांना एकच सांगायचंय. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार? हा उद्रेक एक ना एक दिवस नक्की होईल", असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते. 

साताऱ्यात अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या स्थापना कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. 

"मराठा आरक्षणावरुन होणारं राजकारण थांबायला हवं. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करायला हवा. नरेंद्र पाटलांनी आज अण्णासाहेब फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी त्यांचं आयुष्य मराठा समाजासाठी अर्पण केलं आहे. आपल्याकडे पुढची पिढी आशेनं पाहते आहे. त्यामुळे मला नेत्यांना विनंती करायचीय की लोकांचा अंत पाहू नका, एकदा का उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार? हा उद्रेक एक दिवस नक्की होईल", असं उदयनराजे म्हणाले. 

दुसऱ्यांचं आरक्षण आम्हाला नकोओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरही उदयनराजे यांनी भाष्य केलं. "दुसऱ्यांचा लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही?", असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला. सर्वांना वाटतं मराठा समाज फार सधन आहे. मात्र, मराठा समाजातील मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती वाईट आहे ही वस्तुस्थिती स्वीकारायला हवी. आज जास्त मार्क मिळवूनही विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळत नसेल तर हा मराठा समाजावरील अन्याय आहे, असंही उदयनराजे म्हणाले. 

...त्या लोकप्रतिनिधींचा पाठीशी उभं राहू नकातुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर तुमच्या अधिकारासाठी तुम्हाला साथ देणार नसतील तर तुम्हीपण अशा लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभं राहू नका. तुमच्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, असं उदयनराजे यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा