शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींना मत मागण्याचा अधिकार नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 08:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

मुंबई : विकास, शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, महागाई या महत्त्वाच्या मुद्द्यांऐवजी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजीनगर येथील जाहीर सभेत केली. 

उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ शिवाजी नगर येथे आलेल्या पवार यांनी मोदी यांच्या हिंदुत्ववादी प्रचाराने देशात जातीय तेढ निर्माण होतेय, दोन धर्मांमधली दरी वाढतेय, असेही स्पष्ट केले. मालेगाव स्फोट घडवल्याच्या सन्मानार्थ साध्वी प्रज्ञा सिंगला भाजपाने उमेदवारी दिल्याचा आरोप करत शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून पवार यांनी साध्वी आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला. तत्पूर्वी नोटाबंदी, जीएसटी सारखी मोदींनी राबविलेली धोरणे अपयशी ठरली आहेत. सर्वसामान्यांसह लघु-उद्योजकांचे यामध्ये कंबरडे मोडले आहे. आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्थेतही मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने देश अराजकतेकडे चालला असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खारघरमध्ये केली होती. 

देशात कधी नव्हे ते सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद आयोजित करून मोदी सरकारच्या न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेपाचा पाढा वाचला, तसेच रिझर्व्ह कामकाजातही मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने रिझर्व्ह बँकेचे गव्हरर्नर ऊर्जित पटेल यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे या वेळी नमूद केले. काँग्रेसच्या राजवटीत सरकारने शेतकऱ्यांचा ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. तुम्ही काय केले? याचे उत्तर द्या. जवाहरलाल नेहरू, गांधी कुटुंबीयांनी देशासाठी काय केले? हा प्रश्न मोदी विचारत आहेत. राजीव गांधींनी देशात तंत्रज्ञान, दळणवळण तसेच आधुनिकता आणली, हे विसरता येणार नसल्याचे ते म्हणाले. मोदी हे हिंदुत्वाचा प्रचार करतात. पंतप्रधान कुठल्या एका धर्माचा नसतो तर सर्व जाती धर्माचा असतो, याचा उल्लेख त्यांनी अखेरीस केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019